ऑक्जीटोसिनम स्व:

06 Mar 2018 #Sex Education

तर पोरांनो, आजच्या पाठात आपण शिकणार आहोत आपल्या सर्वात लाडक्या आणि महत्वाच्या हॉर्मोनबद्दल, म्हणजेच आपला 'लव हॉर्मोन' - Oxytocin

खरं तर हे 'हॉर्मोन' फिमेल हॉर्मोनच जास्त आहे, आणि त्यात काहीही आश्चर्य नाही. कारण बायका म्हणजे 'भावनांची' एक ग्यालक्सीच असते आणि त्या भावना तयार करायचं काम हे हॉर्मोन करतात.तुमची 'बाय' चिडली, तर दोष कोणाला द्यायचा - हॉर्मोनलातुमची 'बाय' हसली, तर दोष कोणाला द्यायचा - हॉर्मोनला … तर सगळा उपद्व्याप हे हॉर्मोन करतात यार आणि आपण नावं ठेवतो बायकांना.

आता Oxytocin शरीरात तयार कधी होतं, तर 'ग्यानबा-तुकाराम' झाल्यावर (प्रामुख्याने). 'आया नया उजाला, दो बुंदोवाला' … म्हणजे बायकांना 'दो बुंद सफेदी के' मिळाले की बायका खुश. का खुश ? कारण Oxytocin येतो ना लगेच, हा खेळवत ठेवतो बायकांना गोडीगुलाबीने. 'आलेलेलेले' करत बायकांचा स्ट्रेस, डोकेदुखी, अंगदुखी वगैरे वगैरे सगळ्यांना 'डीशुम डीशुम' करतो. ( तसं ते पुरुषांना पण मदत करतं ) म्हणजे सेक्स झाल्यानंतर (काम झाल्यावर ;) ) देखील दोन शरीर एकमेकांत घुसळत राहतात, त्याचं श्रेय ओन्ली Oxytocin हॉर्मोनला.ये जोडने का काम करता है रे … Orgasm उपभोगायचं कारण काय, तर हे Oxytocin हॉर्मोन.
त्वचेचा त्वचेला होणाऱ्या स्पर्शामुळे, Oxytocin बाहेर पडतं.मसाज केल्यावर बरं का वाटतं, तर Oxytocin हॉर्मोन. म्हणून सांगतो, माणसाने नेहमी नागडं झोपावं.( पुरुषांसाठी टीप - भुकेली मांजर घरात असेल तर एक्सट्रा काळजी घ्यावी हां ????)पण यांचं महत्वाचं काम काय असतं ते लेडीजांमध्ये, बाळाला जन्म देताना आणि दुध पाजताना.
Oxytocin चा सर्वात जास्त प्रताप हा मुल जन्माला घालताना आढळतो. आणि त्या मागोमाग आपल्या लहानग्याला दुध पाजताना.Oxytocin हॉर्मोनच्या कृपेमुळे मुल जन्माला येताना 'गर्भाशय' आकुंचन पावतं. आणि जेव्हा मुल स्तनपान करतं तेव्हा Oxytocin हॉर्मोनमुळे मिल्कची डिलीवरी होते. जाहीर आहे, ज्यांच्या शरीरात पुरेसं Oxytocin हॉर्मोन नसणं, हे दुध येण्यासाठी त्रासदायक ठरतं. काही बायकांमध्ये आपल्या बाळाच्या नुसत्या आवाजाने किंवा आठवणीने दुध यायला लागतं… (पान्हा फुटणे म्हणतात का त्याला ? )त्यात मेंदू काही कारणानिमित्ताने अतिसेंसेटीव झालेला असतो. ते एक प्रकारचं 'हॉर्मोनकन्फ्युजन' असतं. वायरिंगचा प्रॉब्लेम.

एक प्रयोग केला गेला, एका फिमेल प्राण्याला जी आई नाही, तिला बाहेरून Oxytocin हॉर्मोन देण्यात आले, तर असं आढळलं की ती दुसऱ्याच्या पिल्लांसोबत आपल्या पिल्लांसारखीच वागू लागली, त्यांना जीव लावू लागली … वगैरे. थोडक्यात, हा हॉर्मोन जीव लावतो.

हे हॉर्मोन तसं लाजाळू आहे, ते सगळ्यांसमोर येत नाही. म्हणूनच सेक्स, ब्रेस्ट फीडिंग किंवा मुलाला जन्म देणं हे प्रत्येक प्राणी एकांतात करतो. कारण कोणी आपल्याला पाहतंय, त्याची उत्क्रांतीपासून चालत आलेली रक्षणार्थ असलेली भीती, Oxytocin निर्माण करण्याला बाधा आणतात. म्हणूनच सब कुछ चार दिवार के अंदर. कारण स्ट्रेस हॉर्मोन आणि Oxytocin हॉर्मोन या दोघांचं वाकडं आहे. दे आर लाईक दिवस आणि रात्र. एकाचवेळी दोघं असू शकत नाहीत. त्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन, Oxytocin ला ब्लॉक करून ठेवतात.

तुमची 'बाय' जर सेक्स उपभोगत नसेल आणि नुसतीच मुडद्यासारखी पडून राहिली असेल तर त्याचं कारण काय, हे हे हे स्ट्रेस हॉर्मोन. म्हणूनच माझं असं मत आहे की, सेक्स पूर्णपणे उपभोगण्यासाठी तुमच्याकडे 'आर्थिक' स्थैर्य हे सर्वात महत्वाचं असतं. (मानसिक देखील)

oxytocin मध्ये असतात ऑक्सिजनचे १२ रेणू. त्यामुळे आपण जेव्हा शांतपणे श्वासोच्छवास करतो, आपल्याला जास्त Relax वाटतं.शरीरात Oxytocin कमी असण्याचा तोटा हा 'मेंदूला' होतो. Autism, schizophrenia सारखे मेंदूसंदर्भात असणारे रोग हे Oxytocin कमी असण्यामुळे होतात.यापुढे पोरांनी पोरी पटवताना सरळ सांगावं, "प्रिये, चल दोघं मिळून Oxytocin तयार करू…. तुझ्यासाठी काहीही, कधीही, कुठेही …. फक्त तुझ्यासाठी" मिठी मारली तरी काम होतंय…. नायतर त्यांचाच लॉस,आपल्याला काय …. हाय काय अन नाय काय. ????

- इति 'बाबा लपक-झपक हॉर्मोनवाले

By

Mangesh Sapkal

http://www.mangunangu.com/

-By ThatMate