(आपल्या समाजात) आम्ही पुरुष वाढतो कसे?

06 Mar 2018 #Gender Issues

थोडंफार गोंडस असं वयवर्ष ढकललं की आम्ही पुरुष वयात येतो. आमच्याशी ना कोणी कुठल्या सेक्स या विषयावर बोलत, ना आम्हाला कुठली माहिती मिळत. आम्ही तसेच शरीरातले दिवसेंदिवस होणारे बदल घेवून जगत असतो. एरवी शेंबडी वाटणारी पोरगी आम्हाला आता गोड वाटू लागते. त्यात चित्रपटांचा आमच्यावर ठार प्रभाव असतोच. हिरो-हिरोइन आमच्या डोक्यात घर करून बसलेले असतात. जसजसं वय वाढतं तसतसं आमच्यात बॉलीवूड संख्या वाढायला लागते. आम्ही बाहेरून कितीही शाहरुख दाखवत असलो तरी आमच्या नसानसांत इम्रान हाश्मी धावत असतो.

अजूनपर्यंत आमच्याशी काही बोलावं असं कोणालाही वाटत नाही.

यमकांची जुळवा जुळव करत आम्ही कविता करायला लागतो. अगदीच भंगार असतात त्या, तरी कसल्या सोल्लिड वाटतात त्या. शरीरातले होर्मोन्स रंग दाखवायला सुरुवात करतात. मुलीबद्दल वाटणारं आकर्षण हे दिवसेंदिवस वाढतच असतं. मुलींबद्द्लची, तिच्या शरीराबद्द्लची आमची उत्सुकता आता एवढी शिगेला पोहोचते की आम्ही जिथून मिळेल तिथून माहिती काढायला लागतो. टपरीवर बसलेल्या पानवाल्याकडून असो नाहीतर सिक्युरिटी गार्ड असो आम्ही हळूहळू मुलींचे उघडे नागडे फोटो पाहायला लागतो. Breast, Vagina.… तोपर्यंत आमच्यातलं मुल कधीच संपलेलं असतं.

पण अजूनपर्यंत आमच्याशी काहीही बोलावं असं कोणाला वाटत नाही.

घरात नुसतं किसिंग सीन असला कि लगेच आमचे पालक च्यानल चेंज करतात. त्यांच्यामते आमच्या वयाला ते योग्य नसतं. कॉलनीमध्ये असणारी प्रत्येक मुलगी ही पालककृपेमुळे आमच्यासाठी ताई झालेली असते. पण हार्मोन कृपेमुळे आता मुलींना बघताना आमच्या नजरा बदलल्या असतात. मुलींचे Curves आमचं लक्ष लगेच वेधून घेतात.

तरी अजूनपर्यंत आमच्याशी काही बोलावं असं कोणाला वाटत नाही.

दिवसेंदिवस होर्मोन्स आपला प्रखर उजेड पाडायला लागतो. मग कधीतरी रात्री Nightfall व्हायला सुरुवात होते. हेही कुणी आमच्याशी बोललेलं नसतंच. Nightfall …. श्शी. म्हणजे ? म्हणजे Wetdreams. म्हणजे ? म्हणजे चड्ड्या ओल्या. 'आपण काहीतरी वाईट विचार केलेला आहे', 'आपण काहीतरी घाण स्वप्न पाहिलेलं आहे' … त्या चिकटात झोपणं शक्य नसतंच, आम्हाला जाग येते. मग कुणालाही न कळता, मध्यरात्री उठून चड्ड्या धुवायच्या. कारण किती ही शरमेची बाब. आमच्यासाठी तोपर्यंत ते घाणच असतं. कारण लग्न होईपर्यंत अशा गोष्टी पाप तरी असतात, नाहीतर वाईट तरी … हे आमच्यावर समाजाने बिंबवलं असतंच.

अशा कितीतरी रात्री चड्ड्या ओल्या होवून आम्ही उघडतो मग Masturbation नावाचं जग. ते तेव्हाही भारीच होतं आणि आताही. हळूहळू Masturbation वाढत जातं आणि Nightfall कमी कमी होत, बंद होतं. कधीकधीतर Nightfall होवू नये म्हणून आम्ही झोपण्याआधी Masturbation करतो. हे सगळं एखादं जंगली झाड स्वत:हून वाढावं तसं आम्ही तो बदल आत्मसात करत असतो, शिकत असतो.

मग नाक्यावरती उभं राहणं सुरु होतं. हिला बघ, तिला बघ. मग मुलींना वेगवेगळी नावं पडू लागतात. कुणी चिमणी होतं, कुणी पाखरू, कुणी डॉल, तर कुणी माल. Curves नसलेली मुलगी आमच्यासाठी कॅरमबोर्ड होते. आमचे मेंदू आता वासानेनी पूर्ण नासके झालेले असतात. आता आमचा प्रवास पूर्ण चुकीच्या दिशेने सुरु होतो. आम्हाला आता पोरी पटवाव्याश्या वाटू लागतात, टुव्हीलरवर मागे पोरी फिरवाव्याश्या वाटू लागतात. कचकचून ब्रेक दाबणं हे आधीच कल्पून झालेलं असतं.

मग सुरु होते आमची सिड्यांची घेवाण देवाण. म्हणजे Porn. इथे आम्हाल सगळी माहिती मिळते. 'अच्छा, मुल इथून येतं तर' …. त्या पोर्नमध्ये बायका ओरडतात, ते actor जे करतात ते आम्ही खरं मानायला लागतो. "Virgin मुलगी म्हणजे सेक्स न केलेली", हे सगळे गैरसमज मेंदू नासाडी करायला सुरुवात करतात. पुरुषी अहंकारही आम्ही जोपासलेला असतोच किंबहुना समाजाने तो गिफ्टच दिलेला असतो. हे सगळं नित्यनियमाने रोज गुपचूप चाललेलं असतं.

ते वय फार धोक्याचं असतं. पण अजूनही आमच्याशी काही बोलावं असं कोणाला वाटत नाही. ना आम्हाला कोणी निरोध म्हणजे काय याबद्दल माहिती सांगत, ना चित्रविचित्र रोगांबद्दल आम्हाला सांगितलं जात. सगळी माहिती आम्हाला "ते" मधुचंद्राच्या रात्री देणार असतात कि काय कुणास ठावूक.

आमच्या मनात तेव्हा काय काय येत असतं आणि आम्ही कसली स्वप्नं पाहतो याची कुणाला साधी कल्पनाही नसते. बाजूवाली असो, आंटी असो, कि कुठली कामवाली … आमचे हॉर्मोन्स अगदी गळयापर्यंत आलेले असतात. त्यांना फक्त "बाई" हवी असते. नाही म्हटलं तरी १% मेंदू गुन्हेगारीकडे वळणारच असतो. मुलीला भूल द्या, Drugs द्या, नशा करा …. कसंही करून तिचा उपभोग घ्या. हे हार्मोन्स फार वाईट असतात. ते कुणाला काहीही बनवू शकतात.

आपला समाज हा संस्कृतीच्या नावाखाली आपली प्रगती रोखतो.आपला समाज हा माणूस म्हणून मोकळेपणा देत नाही. तो शक्य होईल तेवढी बंधनं टाकतो.आपला समाज माणसाला माणूस म्हणून समजून घेत नाही.आपला समाज बुरसटलेल्या विचारातून अजूनही बाहेर येत नाही.

आमच्या समाजाला अजूनही Sex Education ची गरज वाटत नाही.आपल्याला वाटतं, हे उद्या बदलेल, पण तोपर्यंत आपण समोरच्या पिढीलाही नासवलेलं असतं.मग ती पिढी फक्त शिकते, इंजिनिअर-डॉक्टर होते, चांगली नोकरी मिळवते, पण बुरसटलेल्या पुराण कुजलेल्या वेशी त्यांना सोडता येत नाहीत.आम्ही पुरुष वाईट नसतो, पण चांगलं घडावं म्हणून समाजाचं योगदानही शून्यच असतं.किंबहुना नकळत ते आम्हाला वाईट रस्त्यावरच येवून सोडतात. ज्याने शोधला चांगला रस्ता, त्याला सापडला.जे त्याच्या वाटेत आलं, ते त्याने त्याच्या कुवतीप्रमाणे झेललं आणि तो वाढला.

शेवटी सिमोनला देखील पटलंच ना, "स्त्रीसारखा 'पुरुषदेखील' समाजच घडव असतो"

Mangesh Sapkal

http://www.mangunangu.com/

-By ThatMate