गंडलेल लैंगिक शिक्षण

06 Mar 2018 #Love and Relationships

एका काउन्स्लर शी बोलताना अगदी दोन विरोधाभास असणाऱ्या गोष्टी समोर आल्या आणि आपण अजूनही लैंगिक शिक्षणाच्या दृष्टीने पाठी आहोत ह्याची जाणीव झाली. लंडन मध्ये १० वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या वर्गात कोंडम कस वापरायच ह्याच प्रात्यक्षित दाखवण्यात आल. त्यासाठी पुरशाच्या लिंगाची प्रतिकृती हि मांडण्यात आली होती. कंडोम घालताना पुरुष व स्त्री ह्या दोघांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे. तसेच ते कंडोम घालायची एक पद्धत असते. त्या पद्धतीच प्रात्यक्षित शिकवलं गेल. कंडोम घालण्याआधी कोणत्या छोट्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. त्याच वेळी घालताना अथवा काढताना जंतूचे संक्रमण होऊ नये अथवा कंडोम फाटलेला नाही न हे कस बघावं अश्या सगळ्याच पैलूवर मुलांना म्हणजे वय वर्ष १५-१६ असणाऱ्यांना सांगण्यात आल. ह्यावर त्या मुलीचे भारतीय पालक थोडे प्रश्नार्थक कि काय हे? काहीही सांगतात वगेरे त्यासाठी कौन्सलर ची मदत.

अशीच एक दुसरी गोष्ट एक डबल ग्र्याजुएट असणारी एक मुलगी. लग्न झाल्यावर तिचा नवरा मधुचंद्राच्या रात्री एका अविस्मरणीय अनुभवाचा साक्षीदार होण्यासाठी आसुसलेला तर ती घाबरून गेली. तू कपडे का काढतोस? अस म्हणत बावरलेली. नवरा बिचारा गोंधळून दुसऱ्या दिवशी कौन्सलर कडे घेऊन आला. प्रश्न विचारल्यावर अस लक्षात आल कि सेक्स, संभोग ह्याबद्दल त्या मुलीला काहीच माहित नाही. सेक्स ची मजल फक्त हिंदी चित्रपटातील काही प्रणय दृश्य किंवा किसिंग सीन पुरती मर्यादित आहे. बाकी पुढल्या सगळ्याच्या नावाने बोंबाबोंब. इतक उच्च शिक्षण आणि सावरलेल्या कुटुंबातून आलेली हि मुलगी काही गावाकडली नाही. अगदी मुंबई, पुणे सारख्या शहरातील आहे. हि गोष्ट ऐकल्यावर माझा विश्वास बसला नाही. माझाच काय कौन्सलर ला हि अस घडू शकते ह्यावर विश्वास ठेवण जड गेल.

दोन्ही गोष्टी वेगळ्या किंवा अपवादात्मक ठरवल्या तरी एक गोष्ट अगदी सरसकट समोर येते म्हणजे गंडलेल लैंगिक शिक्षण. सेक्स कसा करावा? इथपर्यंतच आपल लैंगिक शिक्षण सुरु होऊन संपते. कंडोम काय असते? किंवा ते वापरताना कोणती काळजी घ्यावी. तसेच आपल्या मासिक पाळी बद्दल हि कितीतरी स्त्रिया अनभिज्ञ आजही आहेत. हि स्थिती गावामधील नाही तर शहरातील आहे. मासिक पाळी झाल्यानंतर सेफ पिरेड ते गर्भधारणेसाठी योग्य असलेला काळ किती स्त्री आणि पुरूशांना माहित असतो? इथून आपली सुरवात आहे. लैंगिक शिक्षणात मुलभूत पुरुष आणि स्त्री च्या शरीराचा अभ्यास व्हा.वा त्यातून प्रत्येका मध्ये असलेले बदल एकमेकांना कळावे, समजून घ्यावे अस असताना फक्त सेक्स कसा करावा इथवर आपण थांबणार असू तर ते लैंगिक शिक्षण गंडलेल आहे अस मला तरी स्वतःला वाटते.

वयात येणाऱ्या प्रत्येक स्त्री आणि पुरशाला आपल्या जनेनद्रियांची माहिती असण अत्यंत आवश्यक आहे. योनी पासून सुरु होणारा प्रवास तिथेच न थांबता शरीराच्या व मनाच्या अंतरंगापर्यंत जेव्हा पोहचेल तेच खर लैंगिक शिक्षण असेल. आपले पूर्वज ह्यात खूप पुढे होते. खजुराहोची शिल्प सगळ्यांना माहिती आहेत. ती पूर्ण नग्न आहेत. पण कोणत्याही पुरूषाने ती बघताना त्याच्या वासनेच रुपांतर सौंदर्यात होते. हाच वासानेपासून सुरु होणारा प्रवास सुंदरते पर्यंत जेव्हा जाईल तेव्हा आपण कुठेतरी त्या शिक्षणाला पुढल्या पिढी पर्यंत पोचहवू.

सेक्स म्हणजे काय? अस आपण विचारल तर ९९% लोक शिश्नाचा योनी प्रवेश असच उत्तर देतील. पण ते तितकच मर्यादित आहे का? त्याच्या पलीकडे श्रुंगार, स्पर्श, भावना, दिसण, बघण आणि अनेक पायऱ्या त्यात येतात. ह्यातल्या किती पायऱ्या आपण लैंगिक शिक्षणात आपल्या पिढीला शिकवत आहोत ह्याचा विचार आपण सर्वानीच करायला हवा. एड्स, एका पेक्षा जास्ती लोकांशी संबंध, समलैंगिक संबंध आता आपल्या दरवाज्या पर्यंत पोचले आहेत. किती वेळ आपण दरवाजा बंद करून बसणार आहोत? किती वेळ आपण लपणार आहोत? त्या पेक्षा योग्य त्या वेळी योग्य लैंगिक शिक्षण देऊन जर वासनेच रुपांतर सौंदर्यात करू शकलो तर अश्या दरवाज्यावर आलेल्या अनेक गोष्टीनकडे बघण्याची आणि त्यांना सामोरे जाण्याची ताकद आपण पुढल्या पिढी ला देऊ शकू. अन्यथा गंडलेल लैंगिक शिक्षण असच सुरु राहील तर वर असणारे अपवाद कदाचित आपल्याच घरात घडले तर आश्चर्य वाटायला नको.

- विनीत वर्तक

-By ThatMate