सेक्स ही सर्वाना आवडणारी गोष्ट

06 Mar 2018 #Sex Education

पुरुष असो वा स्त्री. सेक्स ही प्रत्येकालाच पटणारी, आवडणारी गोष्ट असते. पण मग त्यावर नीटसर बोलले का जात नाही, किंवा ज्या काळापासून आपण समाज शिक्षित करायला लागलो तेव्हापासून या लैंगिक शिक्षणावर भर का देण्यात आला नाही. मान्य आहे की प्राथमिक वयात लहान मुलं अत्यंत निरागस अशी असतात,त्यांना या गोष्टींचे आकलन होवू शकणार नसते, परंतु मग माध्यमिक शिक्षणाचा स्लॅब पाडताना मुलांच्या मनावर हे बिंबवायला हवे असते, लैंगिक ज्ञान या वयात योग्य पद्धतीने मिळायला पाहिजे होते, मात्र ते देण्यास कमी अधिक प्रमाणात सुरुवात झालेली दिसते. मात्र आमच्या पिढीच्या प्रत्येक व्यक्तीची तडफड की याची सुरुवात आम्ही शाळेत असताना का नव्हती झाली. शाळेत, नववी आणि दहावीत असताना एच आय व्ही आणि एड्स बद्दलची जागृती करणारा एकमेच तास मी शिकल्याचे मला आठवत आहे. त्यावेळी पौगंडावस्थेत निर्माण होणाऱ्या नाजूक कुतुहलाबद्दल आम्हाला समजले, अन हे पण तेव्हाच कळले की आपल्याला जे जाणवतं तेच आपल्या मित्रांना,मैत्रिणींना जाणवत होते. प्रश्न हा आहे की लैंगिक शिक्षण आपल्याकडे जर आता उपलब्ध होवू लागले असेल तर त्याची अभ्यासपूर्णता तपासायला हवी, प्राथमिक वर्गापासूनच याची सुरुवात होणे गरजेचे आहे का, याचा देखील अभ्यास करायला हवा. लैंगिक शिक्षण म्हणजे केवळ मानसिक समुपदेशन होते आहे का ? याचाही शोध घ्यायला हवा, कारण निव्वळ त्यावर भर देवून भागणार नाही. बाजारात जसे शैक्षणिक साहित्य असते, तसेच अशा प्रकारचे शिक्षण देण्यास मदत करतील अशी खेळणी पण उपलब्ध असतात, त्यात थोडाफार बदल करुन त्यांचा उपयोग योग्यरीतीने करता येवू शकतो. निव्वळ घोकंपट्टीचा वापर करुन या गोष्टी बिंबवता येणंच अशक्य वाटते. जर शाळा शाळांतून लैंगिक शिक्षण देण्यासाठी योग्य खेळण्यांची निवड करत प्रात्यक्षिकांसह शिकवणे आवश्यक आहे. या विषयाची व्याप्तीच अशी आहे, की प्रत्यक्षिकाशिवाय पर्यायच उरत नाही. जेव्हा गणित हा विषय सारखी ८,९ वर्ष शिकवले गेला तेव्हा त्याबद्दल कुतुहुल नव्हतं राहिलं वा भीतीही वाटली नव्हती. लैंगिक शिक्षणात काय असावे ? या विषयावर लहानग्या मुलांना सज्ञान करणे म्हणजे त्यांना अतिउच्च पातळीवर नेत, संभोग कसा करायचा हे शिकवणे नव्हे, तर 'सेक्स' विषयावर मुलांच्या मनात उत्पन्न झालेली लालसा, कुतूहल, ईच्छा, योग्य त्या गोष्टी प्रशिक्षित करुन त्या गोष्टी योग्य ज्ञानाने मुलांच्या आंतरमनात दाबून टाकणे होय. अशा प्रकारे जर त्यांच्या अत्यंत साध्या प्रश्नांची आपण जर सोप्या पद्धतीने त्यांना देऊ शकलो, तर कुठेतरी शक्यता नाकारता येत नाही की 'सेक्स'बद्दल केवळ बीभत्स, विकृत असे विचार त्यांच्या मनात कधीच उत्पन्न होणार नाहीत, याचाच अर्थ ज्या अनेक मुलांचे लहानपणी चुकीच्या मार्गाने घाणेरड्या ओढताणी झाल्याने,चुकीच्या विचारांचे कुपोषण होणार नाही. या वयात आवश्यक असणाऱ्या अभ्यासाकडेही त्यांचे लक्ष लागून राहील, कारण अनेक विद्यार्थी निव्वळ या गोष्टीचा वाममार्गी अभ्यासात गुरफटल्याने शैक्षणिक मोठं नुकसान करुन घेतात. शाळाबाह्य मुलांच्या बाबत आपण या विषयासाठी काही करू शकतो का ? माझ्या नजरेसमोर आता तरी याबाबद्दल काहीच उपाय दिसून येत नाही. हा सगळा दोष आपल्याच बालकल्याण शिक्षण विभागातील सुज्ञान जनांनी राबवलेल्या प्राज्ञ मोहिमांचा आहे. मात्र समाजाचा प्रत्येक घटक हा शिक्षणाच्या ज्योतिसह तेवत वाढला पाहिजे, अज्ञानाचे अंधकारी मळभ दूर गेल्यानेच समाजात सुसंस्कृतता येण्यास मदत होणार आहे, महिलांची सुरक्षा ही आपल्या देशात १०० टक्क्यांहून कमी झालेली असताना, सेक्सकडे बघण्याचा सुयोग्य दृष्टिकोन हा फक्त, प्रांजळ प्रामाणिक सुविज्ञान दिल्यानेच निर्माण होऊ शकणार आहे. लिंग चतुर

-By ThatMate