सेक्स हा विषयावर उघडा

06 Mar 2018 #Sex Education

लोकं जेवढं - भ्रष्टाचार, राजकारण, प्रेम, संसार, मुलं, अर्थकारण ...या "निरस" विषयांवर बोलतात, तेवढं ते 'सेक्स'वर उघडपणे कधीच बोलत नाहीत. येवढं निखळ/प्युअर सुख असूनही सेक्स म्हटलं की ते ऑकवर्ड होऊन जातात. सेक्स मला फार आवडीचा विषय होता/आहे/असेल. मला सेक्स जेवढा करायला आवडतो, तेवढं त्यावर बोलायला/लिहायलाही आवडतं. स्त्री-पुरूष नात्यातली प्रत्येक सुख-दुःखाची गोष्ट 'सेक्स' या केंद्राभोवती फिरते असं मला वाटतं. भारतात आल्यापासून बर्याच भारतीय मुलींशी शरीरसंबंध झाले. मुलींनी स्वतःहून सांगावं की, 'मला तुझ्याबरोबर सेक्स करायचंय', ही मला त्यांची स्ट्राॅन्ग बाजू वाटते. स्वतःची शारिरीक गरज एका तिसर्याला सांगणं, तेही भारतासारख्या संस्कृतीत, ही मला धाडसाची बाब वाटते. पण तरी एक प्रश्न अनुत्तरीत राहतोच की, कधीही न भेटलेल्या पुरूषाबरोबर शरीरसंबंध ठेवताना असणारा त्यांचा कंफर्टपणा हा कुठून आणि कसा आला असेल ? सोशल वेबसाईट्सना त्याचं क्रेडिट द्यायला हवं का ? आपण ज्याला आभासी जग म्हणतो ते आभासी कुठल्या दृष्टीने असतं ? 'पुरूष सेक्सला नेहमी हपापलेला असतो', हा शिक्का पुरूषांवर जेवढा लागला, तेवढं ते स्त्रीयांच्या बाबतीत झालं नाही. मला तर कधीकधी ते उलटं वाटतं, 'स्त्रिया ह्या सेक्ससाठी फार हपापलेल्या असाव्यात', कारण त्यांना सेक्स सहज उपलब्ध नाही. त्याची जेवढी वैयक्तिक कारणं आहेत, तेवढीच सामाजिक कारणं आहेत. समाजाने 'कुसंस्कृत' वगैरे ठरवण्याची भिती ही अग्रस्थानी आहे. स्त्रियांचा सेक्सबद्दल असणारा हपापलेपणा जर नुसता 'मानसिक' ह्या कारणावरून पवित्र वगैरे वाटणार असेल तर ते योग्य नाही. कारण पुरूषांची नैसर्गिक शारिरीक रचना पण मग आपण ध्यानात घ्यायला हवी. जसं स्त्रिया स्वतःला जबरदस्तीने स्वतः कोणात गुंतत नाहीत, तसं पुरूषही जबरदस्तीने कोणाबद्दल वासना निर्माण करत नाही. 'कुठला पुरूष सेक्सला नाही म्हणेल', हे वाक्यही मला चुकीचं वाटतं. कोणाचं पोट किती भरलंय आणि पुढ्यात कुठलं खाद्य वाढलंय यावर ते सारं अवलंबून असतं, असं मला वाटतं. पण मग हाच निकष स्त्रियांनाही लागू होतोच ना. एक प्रश्न डोकं खातो तो म्हणजे, मी आतापर्यंत कुसंस्कृत आणि वाह्यात म्हणावं असंच वागत आलोय.... चायनीज, जापनीज, ऑस्ट्रेलियन, श्रीलंकन, फ्रेंच, थाय वगैरै बायकांबरोबर शरीरसंबंध ठेऊन झालेत. पण या सगळ्यांत भारतीय बायकांबरोबरचा आनंद हा जास्त वेगळा वाटतो. मग का असं होत असेल ? मी भारतीय वंशाचा आहे म्हणून ? की इकडच्या बायका इमोशनल फुल असतात म्हणून ? रंगाचा काही संबंध असू शकेल का इथे ? कुणास ठाऊक... कदाचित अमुक एका मतावर पोहोचायची घाई करणंही चुकीचं असेल. इथे महत्त्वाची गोष्ट अशी जाणवते की, इकडच्या बायका (सरसकट सगळ्या नाही) आपल्या शरीराबद्दल, शारिरीक सौंदर्याबद्दल फार उत्सुक वाटत नाही. फिटनेस, खंबीरपणा...हे लॅकिंग जाणवतं. सेक्सबद्दल तर त्या फारच अनभिज्ञ जाणवतात. सेक्स करताना समोर पुरूष असेल तर आपण स्त्रीच्याच भुमिकेत असावं, उगाच त्यात माया-ममता आणून आई व्हायचा प्रयत्न फारच बकवास वाटतो. सेल्फ प्लेजर हे इकडच्या कित्येक बायकांना ठाऊकही नाही. कितीतरी बायका (अगदी तिशीतल्या) ह्या चार चार पाच पाच वर्ष सेक्सशिवाय राहतात. कसं काय कुणास ठाऊक ... असं कोणी सेक्सशिवाय राहू शकतं ही संकल्पनाच डोक्यात घ्यायला जड जाते. हा मला शरीरावर अत्याचार वाटतो. कमीतकमी सेल्फ प्लेजर बद्दल तरी आजच्या स्त्रीने जागृत असायला हवं. इकडे गमतीची गोष्ट जानवते ती स्त्री कुठलीही असो, किसिंग हा तिचा हक्काचा प्रांत आहे. मला किसिंग प्रकार फारसा जमत नाही. त्यामुळे स्वतःहून स्वाधीन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. किसिंगमध्ये सगळीकडेच बायका डाॅमिनेट करत असाव्यात. किसिंगमध्ये आतापर्यंत कुठलीही अशी स्त्री सापडली नाही जी लेचू-पेचू आहे.... मग बायका ह्या बाॅर्न 'किसर्स' असतात, असं म्हणायला वाव आहे का ? आणि जर असं असेल तर त्यामागच्या उत्क्रांतीची कारणं काय असतील ? पुरूषांचा सेक्स हा त्यांच्या मेंदूत असतो.... कल्पनेतला सेक्स प्रत्यक्षात बर्याचवेळा उतरत नाही. आणि जी स्त्री समर्पन करत नाही, स्व देत नाही ती उपभोगता येत नाही. जसा बायकांना पुरूषांचा स्पर्श कळतो, तसं पुरूषांनाही ..... त्यांनाही बायकांचा आत्म्याला हात घालणारा स्पर्श हवाहवासा असतो... शंभर स्त्रियांना समर्पन करायला लावणं हे अशक्यप्राय आहे, म्हणून आपण मोनोगामी असतो की काय कुणास ठाऊक ... अजून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे जे पुरूष इथे भिंतीवर वाघ आणि लिब्रल होऊन फिरतात ते वैयक्तिक आयुष्यात मात्र स्वतःला इनसिक्युर्ड समजतात आणि मग तशी बंधनं ते आपापल्या बायकांवर टाकतात. म्हणजे इथे लिस्टितल्या पुरूषांना जर मी विचारलं, की 'उद्या तुमच्या बायकोने शारिरीक अतृप्तेचं कारण देऊन कुठल्या परपुरूषाबरोबर संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तुम्ही ती किती स्पोर्टिंगली घ्याल ?' ... लग्न म्हणजेच 'सेक्स', हेच मला वाटतं... जरी लग्नात बाकीचे फॅक्टर असले तरी प्रायमरी कारण हे 'सेक्स'च आहे/असावं असं माझं मत आहे. (माझ्या डोक्यातले फालतू विचार आहेत, चुकीचे असू शकतात. क्षणिक सुखासाठी कोणाला फसवणं, कोणाला त्रास देणं वगैरे प्रकार अनैतिकच आहेत... ) मंगेश सपकाळ

-By ThatMate