पॅंटी फेटिशीजम

06 Mar 2018 #Sex Education

सेक्स म्हटलं की पुरुषांच्या डोक्यात वीज चमकल्यासारखं काही होतं कि काय कुणास ठाऊक, आणि त्यात स्त्रीने 'सेक्स' म्हटलं की तर मग त्याचा पार हले-डुलेच होतो. एखाद्या मित्राने त्याच्या गर्लफ्रेंडच्या (तो सिरीयस नसलेल्या) शरीराचं आबंटपणे वर्णन केलं तरी त्याच्या शिश्नूल्याला धाप लागते. बायकांच्या बाहेर वाळत घातलेल्या चड्ड्या पाहूनही बरेच पुरुष Excite होतात. का ? तेच उत्तर, 'चाळवलेल्या कल्पना'. या चड्ड्यांवरून निर्माण होणाऱ्या Sexual Excitement ला - "पॅंटी फेटिशीजम" किंवा "अंडरवेअर फेटिशीजम" म्हणतात. यात, बायकांच्या चड्ड्या पाहून, चड्ड्या हाताळून, स्पर्श करून, चड्ड्यांचा गंध घेऊन, तर काही बाबतीत सेक्सच्या दरम्यान स्त्रियांच्या अंगावरच्या चड्ड्या फाडणं ... वगैरे प्रकारांनी Excite होणं येतं. काहींना बायकांच्या चड्ड्या घालून (स्पेशली पॅंटीहोज) पण Excite होतं. यातही BDSM चा एक डॉमिनेशन हा पार्ट काही स्त्रियांच्या बाजूने रोल प्ले करतो. पुरुषांना स्त्रियांच्या चड्ड्या घालायला लावणं, हे स्त्रियांना पुरुषांवर डॉमिनेशन केल्यासारखं वाटतं. आणि त्यातून त्यांना Excitement मिळते. स्त्रियांच्याही बाबतीत 'पुरुषांच्या चड्ड्या पाहून' Excite होण्याचा प्रकार जरी कमी असला, तरी पुरुषांच्या अंडरवेअर अमुक अशा असाव्यात यासाठी बऱ्याच स्त्रिया आग्रही असतात. आपला पुरुष सेक्सी वगैरे दिसावा हा त्यामागचा एक भाग असतोच. -------------------------- बरं, ते सगळं जाऊदे, पण हे सगळं 'पुरुषांच्या' डोक्यात का चालतं ? तो मुद्दाम हे करत असेल का ? तर नाही, निसर्गाने पुरुषांना 'कामाला' लावलेलं आहे. निसर्गाला मोनोगामी कि पॉलिगामी यात तिळभरही इंटरेस्ट नाही. त्याने पुरुषाला फक्त बायकांना ठोकण्यासाठी लागणाऱ्या वासनेची निर्मिती केली. का ? तर पिढी पुढे वाढावी ... एखादा पुरुष वयाच्या ८० व्या वर्षीही बाप होतो, तर स्त्रीला मेनोपॉजनंतर आराम दिला. म्हणजे ८० वर्षाच्या म्हाताऱ्याने ४०-५० वर्षाच्या बाईलाच ठोकावं, जिचा मेनोपॉज झाला नाही, हा निसर्गाचा क्लिअर उद्देश आहेच. त्यातूनच त्याची पुढची पिढी वाढते. नंतर झालेल्या पुरुषी अहंकारातून, निर्माण झालेल्या कॉम्पलीकेशनमधून समाजव्यवस्थेला 'मोनोगामी' संबंध गरजेचे वाटले. जे एका दृष्टीने मानवासाठी फायद्याचे होते. पण जो निसर्गाने धाडलेला पुरुषांचा वासनेप्रती असणारा 'कौल' आहे, त्याला पुरुष नजरअंदाज करू शकत नाही. किती बायका नागडा पुरुष पाहून Arouse होतात ? तर दुसरीकडे 'नागडी स्त्री' हे दोन शब्द ऐकूनही कित्येक पुरुषांच्या चड्ड्या फुगतात. स्पर्श, भावना हा स्त्रियांच्या सेक्सचा गाभा आहे. तर स्त्रियांकडून 'पूर्ण स्त्री' मिळवणं, त्यासाठी लागणारी टेक्निक हे पुरुषांचं हत्यार आहे. मग ही टेक्निक प्रत्येक पुरुषाची प्रत्येक स्त्रीसाठी वेगळी असते. तिला तिच्या कलेने भुलवणं ही पुरुषांसाठी मोठी कामगिरी असते. मग कोणी पैशाने भूलतं, कोणी प्रेमाने, तर कोणी अजून कशाने .... भुलणं आणि भुलवणं हे दोन्ही नैसर्गिक आहे. कोणी भुलायचं आणि कोणी भुलवायचं हे जो तो ज्याच्या त्याच्या गरजेनुसार ठरवतो. सेक्स करतानाही 'पुरुषी अहंकार' हा भाग डोकावत असतोच. मी तिला किती सुख देतोय हा विचारही पुरुष करत असतोच. करत नसेल कोणी तर करावाच त्याने तो. सेक्सच्या बाबतीत जेवढा पुरुष फँटसीच्या जगात जगत असतो, तेवढी स्त्री ही 'रिअल वर्ल्ड' धरून असते. मला नेहमी वाटतं की 'स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त सेक्स उपभोगत असेल का' ... तिला मिळणारा आनंद हा पुरूषापेक्षा जास्त असेल का ? आता हे उपभोगणं मोजण्याचं पॅरामीटर उपलब्ध नसल्याने ह्या गोष्टी सिद्ध करणं सध्या अशक्य आहे. त्यामुळे हा केवळ एक अंदाज आहे, जो चुकीचाही असू शकतो. पण स्त्री जास्त एन्जॉय करत असेल, असं का वाटतं ? तिचं मल्टीऑरगॅजम असणं ? तिचं किंचाळणं ? की तिचं आपल्या पार्टनरशी एकरूप होणं ? पुरुषाला सेक्सची घाई असते, त्याला फक्त सेक्स सुरुवात करायचा असतो आणि जी प्रक्रिया असेल ते करून शेवट करायचा असतो, .... त्या शेवटी मिळणाऱ्या ऑरगॅजमसाठी त्याचा हा सगळा हावरटपणा. पण एकदा शिश्न योनीशी भिडल्यानंतर त्याला मिळणारं प्लेजर हे बहुतांशी स्त्रियांच्या 'हावभावावर' असतं. खाली काय चालू आहे याच्याशी त्याच्या फारसा संबंध नसतो... सुरुवात आणि शेवट ह्या दोनच गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या असतात. 'तिने त्याला उपभोगणं' ही एक त्याची जवाबदारी होऊन जाते. स्त्रीच्या ओरडण्यावर त्याला मिळणारं प्लेजर डबल होतं. स्त्रियांचं ओरडणं हे त्याला मिळणारी एक पोचपावती असते. तर स्त्रियांच्या बाबतीत स्त्रिया स्टार्ट तू एन्ड उपभोगत असतात, असं मला वाटतं. अर्थात हे सगळं एकमेकांच्या छोट्या-मोठ्या गोष्टींवर अवलंबून असतं. स्त्रियांच्या सेक्स उपभोगण्याचा आणि त्यांच्या आर्थिक स्थैर्याचा, सिक्युरिटीजचा घनिष्ठ संबंध आहे. पण पुरुषांच्या बाबतीत हे फार जाणवत नाही. सेक्ससाठी असणारा पुरुषाचा आणि स्त्रीचा मेंदू .... या दोन्हीत जमीन असामानाचा फरक आहे. पुरुषांसाठी 'Visual' हा पार्ट खूप महत्वाचा असतो. स्त्री भावनिक सेक्स उपभोगणारी असली की तिला पवित्रतेच्या कॅटेगरीत टाकलं जातं. तर पुरुषांनी उपभोगलेलं नेत्रसुख हे त्याला 'फालतू' म्हणायला कारणीभूत ठरतं. 'वासना' ही देखील भावनाच आहे ना ? मग एक भावना पवित्र आणि एक वाईट अशी रूपं का ? दोन्हीही नैसर्गिकच आहेत ना.... माझ्या पुरूषाने मलाच पाहून 'Excite' व्हावं हा अट्टाहास बालिश आहे. आपली व्यक्ती म्हणून कोणी अराऊज होत नाही, पुरूषासाठी ती फक्त स्त्री असते. मला वाटतं प्रत्येक स्त्री-पुरुष नात्याची एक Expiry असते.... आणि म्हणूनच लग्नाची देखील. ज्या नात्यात नावीन्य नाही, कम्फर्टेबल-मोकळीक नाही .... ती नाती लवकरच व्हेंटिलेटरवर जाऊन पडतात. काही वाचतात, तर काही दगावतात. मल्टीऑरगॅजम हे स्त्रियांना मिळालेलं वरदान आहे की नाही हे माहित नाही, पण पुरुषांना मल्टीऑरगॅजम न देऊन निसर्गाने स्त्रियांवर खूप मोठे उपकार केलेत. सेक्स न करून लोकं मला विक्षिप्त होत असतील का हाही विचार डोकवतो. सेक्स न करणं हा स्वतःच्या शरीरावर अत्याचार वाटतो मला. इच्छा नाही, 'तर का नाही' हे शोधायला हवं. एका अत्युच्च सुखापासून कोणी का वंचित राहावं ..... जसं फळं-भाज्या शरीराला गरजेच्या, तसं सेक्स देखील. सेक्स जोपर्यंत सेफ आहे, तोपर्यंत सुंदर आहे. आणि तो सेफ होण्यासाठी समाजात प्रबोधन आणि जागरूकता गरजेची आहे. आजच्या तरुण पिढीने सेक्सवरची आपली मतं बिनधास्तपणे मांडायला हवीत, चर्चा घडवून आणायला हवी. आपले चूक-बरोबर अनुभव सांगायला हवेत. आपल्या पार्टनरशी या विषयावर मनमोकळेपणाने बोलता यायला हवं. आपल्याला काय आवडतं आणि काय नाही, हे आपण आपल्या पार्टनरला सांगता यायला हवं. अयशस्वी सेक्शुअल नात्याचं खापर बर्याचवेळा स्त्रीयांवर फोडलं जातं.... तिचं 'निरस' असणं हे पुरूषांना खटकत असतं. पण तिच्या निरसते मागची कारणं आपण शोधत नाही. ती कारणं आपल्याला प्रत्येकवेळी तोडणं शक्य नसतंच, परंतू ती कारणं जाणून घेणं हे तरी भान असायला हवं. बेडवर स्त्रीचा 'वाईल्डनेस' न अनुभवणारा पुरूष मला कमनशिबी वाटतो. पुरूष बर्याच अंशी रानटी आहे, पण स्त्रीमधला उरला सुरला रानटीपणा हा बेडवरच बाहेर काढून घ्यावा. मंगेश सपकाळ

-By ThatMate