6

06 Mar 2018 #Sex Education

सारखं सारखं काय रे ब्रेस्ट आणि योनी … पोरींना नको का आपल्या एकुलत्या एक 'पिल्लू' बद्दल माहिती मिळावी. तर पोरांनो, आजच्या पाठात आपण पाहणार आहोत शिश्नाबद्दल "अनावश्यक" माहिती. ------ लहान मुलींच्या योनीला लाडीकपणे काय म्हटलं जातं याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत, पण लहान मुलांच्या शिश्नाला त्यांच्या आया-ताया-मावश्यांकडून चित्र-विचित्र नावं देऊन समस्त पुरुष जातीवर बायकांनी एकप्रकारचा सूड उगवल्याचंच आम्हाला भासतं. नुनू काय, नुनी काय …. श्श्श्या ! काही बायका तर "सोनुबाई" पण म्हणतात.…. सोनुदादा, सोनुभाऊ एकवेळ ठीक आहे, पण सोनूबाई …. बाई ??? आणि याचाच सूड म्हणून आम्ही योनीला जर, "पिंकीबाबू" किंवा "काला कव्वा" … म्हटलं तर चालेल काय ? मग मग … आणि ते लहान मुलांना फ्रॉक घालायचं बंद करा रे अडाणी बायकांनो. मुलीची हौस अशी फेडता काय … (माझे दोन फोटो आहेत फ्रॉकमधले लहानपणीचे … :( ) असो, तर आमच्यासाठी "पिल्लू" हा शब्दच म्हटला जावा, असे मी समस्त पुरुषजातीच्या वतीने विंनती करत आहे. जसं बायकांना, लघुशंकेसाठी आणि ग्यानबा-तुकाराम करण्यासाठी कमरेखाली दोन जागा विकत देण्यात आल्या, पूर्ण FSI सकट, तसं पुरुषांना अतिरिक्त जागा न देऊन पुरुषांवर ब्रह्माने पुन्हा पुन्हा अन्याय केलेला आहे. पाणी आणि दही, एकाच पाईपलाईनमधून डिलिवर करून ब्रह्माला कुठला आनंद मिळाला कुणास ठाऊक. त्यावरही त्याची हौस भागली नाही की काय म्हणून बरोबर दोन थैल्या बाजूला जोडून पाठवल्या. त्या थैल्या पुरूषबीज तयार करतात म्हणून आम्हाला काही बोलताही येत नाही. आणि हा सगळा असंस्कृत प्रकार शरीराच्या बाहेर चालू असतो. पुरुषाचं लिंग स्त्रियांच्या लिंगासारखं आत दडवून ठेवलं नाही, यावरूनच पुरुषाच्या लिंगाला किती दुय्यम-तिय्यम किंमत आहे याची आम्हाला जाण आहे. पण तरी ते बाहेर लटकत ठेवून ब्रह्माने तापमानाचं कारण देऊन शिक्षाच दिली आहे असे आम्हास मनोमन वाटते. या लटकत्या लिंगामुळेच पुरुष हा नागडा छान दिसत नाही, असं माझं एक्स्पर्ट मत आहे. ( थोडक्यात, मला नागड्या बायका छान वाटतात) जसं He Man या कॉमिकात हीमॅन ने 'power of universe' म्हटलं की डरपोक Cringer ची साईज वाढून - धाडसी, निर्भय, शक्तिशाली Battle Cat वाघामध्ये रुपांतर होतं, तसंच आमच्या डोक्यात 'पॉवर ऑफ वासना' झाली रे झाली, की आमचं पिल्लूही डबल-टिबल मिसाईल होऊन, ते ही निर्भीडपणे योनिसंगे कुस्ती करण्यासाठी रेडी होतं. --------- मिसाईलमधून जेव्हा आमचे सफेद सैनिक ऊर्फ शुक्राणू स्त्रीबीजाचा शोध घेण्यासाठी सुटतात, तेव्हा ते सगळेच 'पिल्लुभक्त' नसतात. शुक्राणूंचेही प्रकार पडतात. - मिल्खा सिंग' शुक्राणू समस्त शुक्राणूमध्ये 'मिल्खा सिंग' प्रकारचे शुक्राणू फक्त १० ते २० टक्केच असतात. अंड्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणे, हाच त्यांचा उद्देश असतो.यांना Fertilizers म्हणतात. - 'मूर्ख टीन एजर्स' शुक्राणू यांना साल्यांना गांभीर्यच नसतं कशाचं. बागेत फिरल्यासारखे फिरत असतात. कुठेही फिरतात, रमतात. अंड्यापर्यंत पोहोचले तरी ते अंडं न फोडता, खेळत राहतात. ह्यांच्यामुळे बाकीच्यांना पण पोहोचायला त्रास होतो. यांना Blockers म्हणतात. - 'पिल्लुभक्त फायटर्स' शुक्राणू ह्यांचं काम फक्त, 'दुसऱ्या इलाख्यातले शुक्राणू नजरेस पडले, की त्यांना उडवायचं', एवढंच असतं. तोफगोळा घेऊनच, म्हणजे खूप सारं 'Enzymes' (एकप्रकारचं Acid) घेऊन फिरत असतात. दुसऱ्या पिल्लुने सोडलेल्या शुक्राणूंना हे डायरेक्ट गोळ्या घालतात. नो मर्सी एट ऑल. त्याचं काय झालं, आधीच्या काळात बायका, "एक से मेरा क्या होगा" म्हणत बऱ्याच पुरुषांबरोबर एकाचवेळी सेक्स करायच्या. मल्टीऑरग्याजम बाबा. सेक्सच्या दरम्यान बायकांचं ओरडणं हे त्याचाच एक अंश असावं, अशी एक थिअरी मांडली जाते. म्हणजे बायका ओरडून ओरडून दुसऱ्या नराला ," गाबन्या, तू पण ये रे " टाईप बोलावत असत. शुक्राणू स्त्रीच्या शरीरात २ ते ५ दिवस जिवंत राहू शकतात. त्यामुळे कालांतराने शरीरात स्पर्मची उत्क्रांती अशा प्रकारे झाली की, दुसऱ्या इलाख्यातला स्पर्म दिसला रे दिसला की त्याला कोपच्यात घेऊन खर्चापाणी दिला जातो. आणि शेवटचा प्रकार - 'ड्यानी डेण्जोप्पा' शुक्राणू हे कळपात घुसलेले लांडगे असतात. समोर येईल त्या आपल्याच शुक्राणु बंधूला मारत जातात. ह्यांना स्वत:ला अंड्यापर्यंत पोहोचायचं असतं. साला शुक्राणू पण हावरट असतात. श्या ! पुढच्या जन्मी बाईचा जन्म दे रे देवा. ---------- जन्माला येणारं मुल हे 'पिंक' कपडे घालणार की 'ब्लू' … म्हणजेच 'बॉय' आहे की 'गर्ल' हे सातव्या आठवड्यानंतर कळतं. 'X' की 'Y' ह्याचा इफेक्ट सात आठवड्यानंतर कळतो. तोपर्यंत पुरुषाला Clitoris (मदनाचल) असतं. बाईsssss ! मुलगा होणार असेल तर सात आठवड्यानंतर कोंब फुटायला सुरुवात होते. पुरुषांसाठी वाईट बातमी ही की, प्रत्येक स्पर्म 'X' किंवा 'Y' क्रोमोजोम बरोबर घेऊन जात असतो. त्यातलं 'X' क्रोमोजोम घेऊन फिरणारा स्पर्म, फिमेल स्पर्म हा 'Y' घेऊन जाणाऱ्या मेल स्पर्मपेक्षा फास्टेस्ट आणि शक्तिशाली असतो … हे डीस्क्रीमीनेशन नाही देवा ? का हा छळ ? पुरुषांच्या थैल्या म्हणजेच वृषण हे शरीराच्या तापमानापेक्षा थंड तापमान प्रिफर करतात. म्हणूनच गरमी आली की थैल्या शरीरापासून लांब जातात, म्हणुनच त्या अजून लटकल्यासारख्या वाटतात. तर थंडीत त्या घट्ट पकडून बसतात. उन्हाळ्यात नागपूरमध्ये ४०-५० डिग्री तापमान असल्यावर पुरुषांच्या थैल्या गुडघ्यापर्यंत खाली येतात ( जस्ट जोकिंग हां ) ---------- आता एक वाईट बातमी. आपापलं पिल्लू पकडून ठेवा. Guolizhuang म्हणून बीजिंग मध्ये एक रेस्टोरंट आहे, जिथे ३० प्रकारचे 'पेनिस' (वेगवेगळ्या प्राण्यांचे) खाण्यासाठी मिळतात… आग लागो त्या रेस्टोरंटला. सगळ्या पुरुषांनी मिळून निषेध नोंदवायला हवा खरं तर. यापुढे मी बीजिंगला कधी जाईन असं वाटत नाही. असो. शिश्नांचे वेगवेगळे प्रकार असतात. अमिताभ शिश्न, आमीर शिश्न, दारा सिंग शिश्न … वगैरे. (मंगू शिश्न असा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही, आधीच सांगतोय). तर बायकांनी निरनिराळे शिश्न आपल्या रिस्कवर हाताळावेत. एकच शिश्न किती दिवस बघणार … वेरी बोरिंग हां. शिश्नाची साधारण साईज ही ३ ते ५ इंच असते. सर्वात मोठा असलेला शिश्न, वर्ल्ड रेकॉर्ड हा १९ इंचाचा (४८ सेमी ) आहे. बाबौ. 'गळयापर्यंत येणे', याचा आज नव्याने साक्षात्कार झाला. ???????? ------------- आता महत्वाचं. म्हटलं जातं, एका चमच्यात ८ ते १० करोड शुक्राणू मावतात. ( किती अश्लील असेल हे असं करणारा ) प्रत्येक पुरुष आपल्या वृषण फॅक्टरीत दिवसाला साधारण ६ ते ८ करोड शुक्राणू तयार करतात. जेवढी मोठी फॅक्टरी, तेवढं जास्त प्रोडक्शन. मग आता हे स्पर्म ठेवायचे कुठे ? ते बाहेर काढावेच लागतात. नाही काढले तर मग सकाळी उठून चड्ड्या धुवाव्या लागतात. लग्नानंतर बायको "चांगली / गुणी" असेल, म्हणजे नाही म्हणणारी नसेल आणि मुलं त्यांच्या बेडरूममध्ये झोपत असतील, तर ते शुक्राणू स्वहस्ते बाहेर काढण्याची गरज पडत नाही. बायकांना आपल्या पुरुषाकडून 'बेस्ट स्पर्म' हवे असतील तर आपल्या पुरुषांबरोबर रेग्युलर ग्यानबा-तुकाराम करण्याशिवाय किंवा त्यांना सटासट करून देण्याशिवाय पर्याय नाही. आता बायकांसाठी, सीमेनमध्ये, म्हणजेच विर्यात फक्त १ ते ७ कॅलरीज असतात. तर बायांनो, वजन वाढायची काळजी करू नका. शुक्राणूंना कमरे वरचं शरीर देखील पाहायला मिळू द्या कधीतरी … ???????????????????? झालं हां … ( 'कठीण कठीण कठीण किती, पुरुष शिश्न बाई' या काव्यसंग्रहातून )

-By ThatMate