हस्तमैथुन: समज, गैरसमज

06 Mar 2018 #Sex Education

कसं सांगावं आणि काय बोलावं हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे. मात्र तरीही या विषयावर मला बोलणे अगदी गरजेचे आणि योग्यच वाटते. अतिशय संवेदनशील, असा विषय हाताळताना मला कोणत्याही प्रकारची किळस येत नाहीये, याचे कारण की या गोष्टीचा कोणताच अपाय नाही, तर शरीराला एक वरदान असल्याप्रमाणे ते आहे, आणि म्हणूनच या गोष्टीवर मोकळेपणाने चर्चा होणे खूप अपेक्षित आहे....हा विषय चार चौघांच्या दरम्यान मोकळेपणाने बोलला कधीच जात नाही, नेहमीच या विषयाला धरून टवाळगिरी करण्यात येते, अथवा कोणी यावर बोलायला गेल्यास त्याची लाज काढण्याचेही प्रकार घडतात. आणि तो विषय म्हणजेच हस्तमैथुन.

स्वतःच्या हाताने केलेला प्रणय म्हणजे हस्तमैथुन, यात स्त्री अथवा पुरुष त्याच्या लैंगिक अवयवाला उत्तेजीत करतात, त्याद्वारे लैंगिक उत्कट बिंदू गाठला जातो याला हस्तमैथुन असे म्हणण्यात येते. अनेक महिला पुरुष हे करतात आणि यात वाईट असे काही नाही, याच्यामुळे तुम्हाला टक्कल पडत नाही की तळहातावर केसही उगवत नाही, नाका तोंडावर येणाऱ्या पुळ्याही यामुळे होत नसतात. हस्तमैथुन केल्याने तुमची लैगिक शक्ती ऱ्हास पावत नसते, असे नानाविविध गैरसमज लोकांच्या मनात बसलेले आहेत, खासकरुन महिलांच्या बाबत असे अनेकदा आढळून येते. त्यांना याबाबत काहीच बोलायचे नसते, किंवा कुणी या विषयावर बोलू इच्छित असेल तर त्याला सरळसरळ घाणेरडा मनुष्य असे संबोधले जाते, बुद्धाने सांगितलेल्या तत्वज्ञानात स्वतःवर प्रेम करण्यास शिकवलं गेलं आहे, हा त्यायलाच एक भाग आहे, पण अनेक लोक फक्त, कुत्सितबुद्धीने याकडे पाहतात.

याविरुद्ध वागणाऱ्या देखील अनेक महिला आणि मुली माझ्याशी परिचित आहेत. ज्यांचा मला तरी अभिमान आहे. हस्तमैथुन हे आपल्याला मिळालेले वरदानच आहे हे त्यांनाही ठाऊक आहे. काहीवेळेस असे अवघड पेचप्रसंग आलेले असतात जीवनात की त्यातून कुणीतरी बाहेर काढावं हे वाटत असतं, अशावेळी आपण स्वतःच स्वतःला बाहेर काढू शकतो याची जाणीव मात्र अनेक स्त्रियांना नसते. स्त्रियांच्या बाबतीत हस्तमैथुन ही नैसर्गिक गोष्ट आहे, स्वतःच स्वतःला काबूत ठेवू देणारी अशी ही बाब आहे. यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आपण सहवासाची कल्पना करतो, त्यामुळे अल्पकाळ का असेना पण भरभरुन जगत, आनंदी राहता येते, ह्या एवढ्याशा सुखाने देखील आयुष्यात बराच फरक पडत असतो.... जगातल्या प्रत्येक गोष्टीला प्रश्न असतात, तसे या पण गोष्टीवर अनेक शंका, प्रश्न उपस्थित होतात, स्वाभाविकपणे.... जसे की आपला भारत देश मानवता धर्म कमी मानणारा आहे त्यामुळे त्यांना वाटते उद्या, मी धार्मिक पद्धती अवलंबली तर मी हस्तमैथुन करणारी आहे, मी अपराधी आहे, पापी आहे... पण वास्तविकता असे सांगते हस्तमैथुन हे या प्रकारात येतच नाही, तो काही गुन्हा नाही, पाप नाही, मुळात कोणत्याही धार्मिक विधी करण्याचा आणि हस्तमैथुन करण्याचा काय संबंध ??? लग्न करण्याच्या दिवशी तुम्ही दूध चहा घेणार नाही का ? किंवा ब्रश ने दात घासणार नाही का ? गायीच्या वासरुचा घास तोडून तुमच्यापर्यंत आलेलं दूध घेऊनच धार्मिक विधीप्रारंभ होतो ना, मग तेव्हा अपराधी असल्यासारखं वाटत नाही, दात घासताना जनावराच्या केसाने दात घासल्याचे गिल्ट येत नाही, मग धार्मिक विधीस सामोरे जाताना आपण हस्तमैथुन केलं आहे याचा गिल्ट का यावा ?? हे खूप हास्यास्पद वाटते मला, काही डॉक्टरही असेच म्हणतात... आणि सगळी जगभरातील सर्वेक्षण सांगतात की अशा प्रकारे उपभोग घेतल्यावर प्रत्यक्ष संभोग करण्यात कोणीच कधीच कमी पडत नाही, याउपर म्हणेल हे कधी केलंच नसेल तर हमखास पहिली रात्र तुमची वाया जाते, कारणे नंतर कधीतरी

स्त्रियांच्या आरोग्याच्या बाबत खूप मोठे काही फायदे आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रॉस्टरेट कॅन्सरपासून बचाव करता येणे, व्हजायनल मसल्सला हानिकारक असे जिवाणू, विषाणू ज्यापासून घातक संसर्ग होऊ शकतो अशांना शरीराबाहेर टाकण्याचे कार्य हस्तमैथुनातून होते.... टाईप 2 डायबेटीज होण्याची शक्यता हस्तमैथुन केल्याने जवळपास शून्य होते. सगळ्यात भारी फायदा म्हणजे स्वतःबद्दल, स्वतःचा विचार,प्रेम करायला स्त्री शिकते, जागरूक होते. पाळीच्या दिवसात असह्य अशा वेदना होतात, त्या कमी करण्यासाठी हस्तमैथुनचा उपयोग हा होतोच होतो, शरीराला अतिरिक्त आकड, ताण आलेला असतो त्याचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.

हस्तमैथुन केल्याने डोपामाईनचे प्रमाण वाढते, त्यामुळे स्त्री स्वतःला ताजेतवाने करु शकते, यामुळे नैराश्य, थकवा कमी होतो, त्यामुळे मन, शरीर प्रसन्नता वाढण्यास मदत मिळते...

हस्तमैथुन केल्याने झोप चांगली मिळते. स्त्रियांना ज्यांना रात्री झोप न येण्याचा त्रास होतो त्यांनी रोज रात्री बेडवर जाण्याआधी बाथरूममध्ये जावे, किंवा बेडवरच हस्तमैथुन केलं तर उत्तम असे...

आता जो फायदा सांगेल त्याने खरोखर हरकून जाल. स्त्रियांनी हस्तमैथुन म्हणून देखील करायला पाहिजे. विज्ञान याचे उत्तर देते, लैंगिक समाधान, व्यायाम आणि स्नायूंना बळकटी देण्याला हे उपयोगी आहे. सगळ्यात महत्वाचा अवयवापैकी एक म्हणजे व्हजायना आणि त्यास बळकट करायला हा एक थोर व्यायाम प्रकार आहे.....

मानसिक ताणतणाव हे आजकाळात नेहमीचे आहेत. ते दूर करण्याला देखील हस्तमैथुन हा उपाय आहे, हे तर मी स्वतः अनुभवलं आहेच, इतर तो, ती देखील सांगतात, प्रवासाने अथवा एखादी क्लिष्ट समस्या न सुटण्याने आलेल्या तणावाला दूर करण्यासाठी हस्तमैथुन हा जबरदस्त उपाय आहे...

जुलै महिना हा विश्व हस्तमैथुन महिना असतो. त्यानिमित्ताने म्हणा किंवा आपल्या देशात गरजेच्या झालेल्या लैंगिक शिक्षण प्रसारण करण्यासाठी म्हणा, सदर लेख मी लिहिला आहे. याकामी मला काही डॉक्टर, मैत्रिणी यांनी मदत केली.

Vishal Lonari , Nashik

He holds a master's degree in Mass Communication and journalism

vishallonari.blogspot.in

-By ThatMate