शिश्नं आरोग्यं संपदा

06 Mar 2018 #Taboos

शिश्न, लंड किंवा लवडा. माणसाच्या शरीराला असणारा, सर्वतः सुंदर आणि दखलयोग्य अवयव म्हणजे शिश्न. परंतु आपण जन्मभर अगदीच क्वचितवेळ या लंडच्या आरोग्यासाठी देत असतो. खरे पाहता आयुष्यात येण्याचे, जगण्याचे सर्वात महत्वाचे कारण आपल्याला लवडाच देतो मात्र आपण त्याचे कितीदा धन्यवाद करतो.  आपण असे समजून चालत असतो की जसे आयुष्य पुढे जातं तसा तसा लंडही, मात्र हा घातक समाज आहे. जर योग्य निगा राखली गेली तर आयुष्यान्हार उत्तम लैंगिकता आपल्याला लंड देवू शकतो. त्याकरीता आवश्यक असणाऱ्या गोष्टी, पथ्य आपण व्यवस्थित पाळायला पाहिजे, जेणेकरुन शरीर जरी उतारवयाकडे जावू लागलं, तरीही आपला लंड म्हातारा होण्याचे विसरलेला असतो. परिणामी आपल्याला आयुष्यभर लैंगिकता उपभोगता येते. आज काही सोप्या गोष्टी बघूया ज्याने आपण आपल्या लंडचे आरोग्य बलवान करु शकू. फक्त यावरच अवलंबून राहू नका, तर चांगल्या युरोलॉजिस्टचा सल्लाही तुम्हाला उपयोगी पडेल. वजन नियमन करा : माणूस जास्त लठ्ठ झाला तर त्याच्या शरीरात टेरेस्टेरोन बनण्यास अडचणी येतात. आणि वाढलेल्या चरबीमुळे टेरेस्टेरोन हे इस्ट्रोजेनमध्ये परावर्तीत होण्याची जास्त शक्यता असते. रक्तधमन्यांमध्ये येणाऱ्या अतिरिक्त स्थूलपणामुळे लंड अधिक काळ ताठर राहू शकत नाही.  स्मार्ट जेवण : आपल्या आरोग्यदायक आणि पोषणमूल्ये असणाऱ्या जेवणामुळे देखील लंड सुस्थितीत राहण्यास मदत होते. पूर्णपणे नैसर्गिक आहाराचे सेवन केल्याने लंडाकडे वाहणारा रक्तप्रवाह हा सुरळीत, न  थांबता होत राहतो. ताण कमी करा : शरीराला होणाऱ्या अतिरिक्त ताणामुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रोल तयार होते. परिणामी रक्तधमन्या रुंद व्हायला सुरुवात होते. एड्रेनलाइन हार्मोन आणि कोलेस्ट्रोल तयार झाल्याने लंडच्या ताठरतेवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे शरीरसंबंध ठेवताना अडचणी निर्माण होतात. कोलेस्ट्रोल हे शरीरावर मेद वाढवण्यास म्हणजेच चरबीचे पोषण करण्यास मदत करते. तंबाखू सोडा : तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन तसे संपूर्ण शरीरालाच घातक. तंबाखू हे रक्तवाहिन्या रुंद करते. रक्तप्रवाहास बाधा पोहोचणे, ऑक्सिजन पुरवठा कमी करणे, अशा घातक परिणामांनी शरीरातील प्रत्येक अवयवास हानी करणे अशी कामे तंबाखूमुळे होतात, म्हणून तंबाखू पूर्ण वर्ज्य करायला हवी. अल्कोहोल कमी करा : थोड्या प्रमाणात घेतलेल्या अल्कोहोलमुळे रक्त प्रवाह वेगवान होतो, मात्र अल्कोहोलचे अतिसेवन हे लंडास कायमचे अपोषक बनवते, लंड काम करेनासा होऊ शकतो. – लिंग चतुर  

-By ThatMate