प्रसार माध्यमांचा प्रभाव

16 Dec 2019 #Mental health

Blog Image

सोशल मीडिया चा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.नवनवीन app ही येत आहेत आणि तो प्रभाव फक्त किशोरवयीन मुलांवर नाही तर प्रौढांवर ही होताना दिसत आहे.मोबाईल,इंटरनेट, नेटवर्क या तीन गोष्टी आपल्या मुलभूत गरजा झाल्या आहेत.त्यामुळे आपली जितकी कामे सोपी होतात तितकेच घातक परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत.आज प्रत्येकाकडेच स्मार्टफोन आहे. सध्या माणसे स्वतः ची कामे विसरतात परंतु,सोशल मिडीयावर काय चालू आहे हे बघण्यास तो विसरत नाही.सोशल मीडिया हे एक मनोरंजनाचा पिठारा बनला आहे,आणि किशोरवयीन तसेच युवक यापासून जराही लांब राहू शकत नाहीत.

         सकाळी उठल्यावर सर्वात आधी मोबाईल बघितला जातो,आपण पोस्ट केलेल्या फोटोला किती likes आले,किती comments आल्या हे बघीतले जाते.

       तसं पाहायला गेलं तर सोशल मिडीयाचा सकारात्मक उपयोग ही आहे.जसं की जगातील सर्व घटनांची माहिती मिळते,समाजात काय चाललं आहे हे समजते,एखाद्या नवीन विषयाची माहिती हवी असेल तर इंटरनेट च्या माध्यमातून आपण ती मिळवू शकतो. परंतु काही लोकं याचा दुरुपयोग करतात उदा.लोकांना अश्लिल फोटो आणि व्हिडिओ मुद्दामहून पाठवणे इ. यामुळे लोकांच्या मानसिकतेवर वाईट आणि घातक परिणाम होत आहेत.किशोरवयीन मुलांमध्ये आक्रमक वृत्ती वाढत आहे व अपराधी वृत्ती ही वाढत आहे.

         इंटरनेटच्या अतिवापरामुळे लोकांमध्ये दुरावा वाढत चालेला आहे.आणि या डिजिटल युगात आपण सोशल मीडिया वर अनोळखी नवनवीन मित्र  बनवतो पण आपल्या जवळ असणाऱ्या व्यक्तींशी आपण मैत्री करत नाही. यामुळे नैराश्य,अवसादचे ( depression ) प्रमाण दिवसेंदिवस वाढलेले दिसून येते आहे.

-By Vishranti Nikam