आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि FGM

06 Mar 2018 #Taboos

FGM हा प्रकार केवळ आफ्रिकेत नाही तर भारतामध्ये स्त्रियांची सुंता करणे हा प्रकार बोहरा समाजात चालतो ज्याला खतना असे म्हणतात. वयात येणाऱ्या मुलींच्या जनांगातील अवयव कापले जातात ते कधी ब्लेड, गंजलेले चाकु व काचेच्या धारदार भागाने आणि त्यात बऱ्याच वेळा रक्तर्स्त्राव आणि जखमांना त्या बळी पडतात.

हि प्रथा बंद व्हावी यासाठी मुंबईतील पत्रकार आरेफा जोहारी हिने 'सहियो ' नावाची संघटना उभी केली आहे. ती स्वतः या प्रकाराचा बळी आहे आणि अन्य मुलींना वाचविण्यासाठी तिची धडपड आहे. सहियो संस्थेच्या ओनलाईन सर्वेक्षणात 81% स्त्रियांनी हि प्रथा बंद व्हाव्ही असे म्हटले आहे. कधी होणार स्त्री मुक्ती या देशात?

स्त्रिया म्हणजे काय गणपतीच्या मूर्ती थोड्या आहेत की 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनोत्सव म्हणून त्यांची पूजा करायची आणि नंतर विसर्जन करायचे. मागच्या महिन्यात एक बाल विवाह रामोजी फिल्म सिटी जवळ असलेल्या एका वेद पाठशाळेत आम्ही थांबवला . मुलगी 13 आणि मुलगा 16 वर्ष वय. परिवार सुशिक्षित . मुलीची आई कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक. मग काय फायदा त्या शीक्षणाचा . त्यापेक्षा अडाणी बरें म्हणायचे????

सांगली जिल्ह्यातील म्हाईसाळ गावात 19 अर्भक नाल्यात फेकून दिलेली सापडली. सीमावर्ती भागात लिंग चाचणी करून अश्या प्रकारे भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे . डॉ सुदाम मुंडेंची अवलाद वाढत चालली आहे. कधी थांबणार हे दुष्टचक्र??

पुरुषांची स्त्रियांकडे पहाण्याची मानसिकता बदलन्याबरोबरच स्त्रियांनीही भीतीला न घाबरता स्वतः च्या क्षमतेवर विश्वास ठेवला तर कधीही त्या बळी पडणार नाहित असा आत्मविश्वास आहें . सर्वांनी मिळूनच स्त्रियांना सामाजीक, मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचा संकल्प आज करुयात आणि महिलांच्या कर्तुत्वाला सलाम करत येणारा प्रत्येक दिवस हा महिला दिनोत्सव म्हणून साजरा करूयात या अपेक्षांसह.
महेश भागवत

-By ThatMate