We talk sex!

Let's Talk About Sex - ThatMate
स्पर्श अनुभूती किंवा जाणीव ही मुलभुत जाणीव  आहे जिवंत पणाची .स्पर्शांना अर्थ आहेत जसे शब्दांना आहेत आणि शब्द जसे खोटे वापरता येतात तसे स्पर्श जर सत्याला सोडून असतील म्हणजे सच्चे नसतील काही कारणाने केले गेले असतील तर ते तितकेच निरर्थक असतात किंवा कालांतराने ठरतात निरर्थक म्हणूनच सर्वच नाती या ठिकाणी येउन एक “पारख” मागतात. जन्मतः झिडकारले गेलेल्या तान्ह्या पासून सर्व नात्यांना एक स्पर्श गंध  उणिवेचा  किंवा ती तिथे असण्याचा वावर असतो. नकळत तो समजुतीच्या जाणीवेवर राहतो पण सर्व  नात्यात राहून तो जेव्हा  “सेक्स पार्टनर “या नात्यात प्रवेश करतो तेव्हा तो काही कसोट्यांवर उतरतो.
म्हणून रंग रूप आणि सहज बाह्य  व्हायटल स्टेटस पाहून केलेला संग दर वेळी  कंम्पेटीबलं असतोच असं नाही  आणि ते नंतरच कळतं. म्हणूनच “लग्न” या नात्यात या सम समानतेच “कस ” आहे तो आपल्याला कुठेही चर्चेत पाठ्य  पुस्तकात   नसतो. प्राण्यांचे प्रजनन इतकाच विषय पौगंड अवस्थे  पर्यंत येतो तो सुद्धा  प्रजनन विषया पुरता. प्लेझर ..आनंद हा विषय जो खरं  तर  सर्वात सिग्निफीकंट आणि इथे गल्लत सुरु होते शरीर मागणी आणि बाह्य समाजातील नियम समज- गैरसमज आणि बंधनांची. मग जर नेट वर्क नसेल तर दोन लाखाचा हिरेजडीत फोन जसा निकामी ..तसेच नाते रिकामे होऊ लागते सर्व गोष्टी देऊनही .
तलाश चित्रपटात  एक संवाद आहे ”  क्या कोई पूरी तरह से खुश है?”उत्तर येतं हां कुछ पल के लिये …
तर हा जो काही “पल” असतो नि जे पकडतात ते साधतात आता हे जे सर्व क्राफ्ट आहे हे कशात साधेल  म्हणजे कुणात ते माहित नाही म्हणजे त्याचे ठोकताळे अनिर्णीत ठेवलेत विधात्याने मग शोध सुरु होतो कोरडे पणावर  ओलावा शोधण्याचा आणि मग “शब्द” जादू दाखवतात स्पर्श शक्य नाही तिथे शब्द  चालून जातात. सर्व मुलभुत भावनांची स्वीकृती जिथे जिथे लाथाडली जाईल तिथे तिथे विकृती जन्म घेईल. त्याचे बाह्य रूप असेल आजार बळजबरी  किंवा मल्टी सेक्स पार्टनर्स म्हणूनच आज सर्वात जास्त अदृश्य सोशल मिडीया वर मेसेज बॉक्सेस भरून वाहात आहेत कारण निसर्ग नागडा होऊन तिथे प्रश्न करतोय .
कुणी सेक्स देता का सेक्स? चला भेट नाही तर निदान बोलून? ..वुई टॉक  सेक्स.
संगीता शेंबेकर

Leave a Reply