Vasectomy

Vasectomy की जय

एन.एस.व्ही. म्हणजे नॉन स्काल्पेल व्हॅसेक्टॉमी, पुरुषांची बिनटाका शस्त्रक्रिया. स्त्रियांच्या शस्त्रक्रियेशी तुलना करता ही कितीतरी चांगली आहे. पण अजिबातच लोकप्रिय नाही. उलट जरा बदनामच आहे.

कीर्तन हे लोकशिक्षणाचं पूर्वापार माध्यम. एनएसव्हीची माहिती देणारं आणि महती गाणारं हे कीर्तन; मी केलं, मजा आली, मलाही आणि श्रोत्यांनाही. तुम्हीही करून पहा.
काही अभंग, आर्या, गाणी यांच्यातल्या शब्दांची मोडतोड करून ते इथे वापरले आहेत; कीर्तनाचा ‘कीर्तन’पणा शाबूत रहावा म्हणून. तेवढा गुन्हा पोटात घालावा ही नम्र विनंती.

(पेटी, तबला, टाळ, चिपळ्या असा मेळ जमला आहे. पेटी तबल्याच्या एखाद्या झोकदार सुरावटीनंतर भजन सुरु होते. सर्व श्रोत्यांना भजनात सहभागी करून घेतले जाते.)

राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
बोला पुंडलिक वरदा, हाsssरी विठ्ठल
श्री ज्ञानदेsssव तुकाsssराम, पंढरीनाथ महाराज की जय

नाही गायनाचा गळा, नाही अभिनयाच्या कळा,
परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू
(ह्या चरणात योग्य तो बदल करून बुवा आपलं नाव उघड करतात)
तेंव्हा मंडळी हे असं आहे, आम्हाला ना गाता येतं ना अभिनय करता येतो, पण…
‘परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू’
अहो कीर्तन करणं म्हणजे महाकर्मकठीण काम. एक वेळ चित्र काढणं सोपं, रंगाचे चारदोन फटकारे इकडून तिकडे ओढले की काम झालं, एक वेळ नृत्य करणं सोप, तबल्याच्या ठेक्यावर जरा हात, पाय, मान, कंबर हलवली की काम झालं.
नाटक करणंही सोप आहे बरं, अहो दुसऱ्यांनी लिहिलेली वाक्य घडाघडा पाठ म्हणून दाखवली की काम झालं.
आणि चित्रपट काढणं तर सर्वात सोपं…
तिथे कपडे सांभाळायला वेगळा माणूस आहे, तोंड रंगवायला वेगळा माणूस आहे, गाणारा भलताच आहे, फोटो काढणारा आणखी वेगळा आहे, तुमच्याऐवजी साहसे साकारणारा वेगळा आहे, दिग्दर्शक आहे, कला दिग्दर्शक आहे, संगीत दिग्दर्शक आहे, नृत्य दिग्दर्शक आहे, इतकच काय मारामारीसाठीही वेगळा दिग्दर्शक आहे.
पण किर्तनाच तसं नाही. अहो कीर्तन करायचं म्हणजे
वाणी शुद्ध हवी, विचार उत्तम हवेत, शब्दोच्चार स्पष्ट हवेत, भाषा ओघवती हवी आणि वक्तृत्व अमोघ हवं, अवांतर वाचन हवं आणि पाठांतर दांडगं हवं. तुम्हाला गाता यायला हवं, तुम्हाला बजावता यायला हवं (चिपळ्या वाजवून दाखवतो) थोड नृत्यही आलं तरी चालेल.(बुवा नाचुनही दाखवतात)
नामदेवानी म्हटलेलंच आहे,
‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी
सर्व सांडुनी माघारी, वाटे विठ्ठल रखुमाई,
परेहून परते घर, तेथे राहू निरंतर’
पण आम्ही तर सुरवातीलाच सांगून टाकलंय…
नाही गायनाचा गळा, नाही अभिनयाच्या कळा,
परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू
मग आता तुम्ही असं विचाराल मंडळी, की हे भलतं धाडस आम्ही केलंच कसं? याचं कारण आजच्या आख्यानाचा विषय. अहो मोरोपंतांनी म्हटलेलं आहे….
‘सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.’
पण आम्ही म्हणतो,
एनएस व्ही सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा आवडो
तुम्ही म्हणाल, ही एनएसव्ही काय भानगड आहे? आणि ‘विषय सर्वथा नावडो’चा आम्ही ‘आवडो’ कसा काय केला? कोणत्या अधिकारात केला? मायबाप हो, एवढा अपराध पोटात घालावा. हे आम्ही का केलं ते सविस्तरपणे उत्तररंगात सांगणारच आहे पण उत्तररंगात चंचूप्रवेश करण्यापूर्वी, विषयप्रवेश करण्यापूर्वी, पूर्वरंगाची अखेर नामस्मरणाने व्हायला हवी, अहो परंपराच आहे तशी.
तेंव्हा म्हणा…
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
बोला पुंडलिक वरदा, हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय
(बुवा हार घालून घेतात, बुक्का लावला जातो, तबक फिरवलं जातं)
खरंतर उत्तररंगात परंपरा मोडण्याबद्दल मी बरंच काही सांगणार आहे. तेंव्हा नामस्मरणापेक्षा थोड्या वेगळ्याच ढंगात उत्तररंगाचे सुरवात करुया… म्हणा…
(बुवा राम राम सीताराम सुरु करतात आणि मधूनच पुढील ओळी गातात)
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(पुन्हा राम राम सीताराम… अगदी पुंडलिक वरदा पर्यंत होतं आणि पुन्हा)
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
ट्युबेक्टॉमी म्हणजे बायकांचे नसबंदीचे ऑपरेशन. जसं मघाशी मी सांगितलं की एनएसव्ही हे पुरुषांचे तसे हे बायकांचे. तर माझं म्हणण असं की….
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको

(… आणि आता पुंडलिक वरदाच्या चालीत…)
बोला… एनएसव्ही ऑपरेशsssन कराsssरे मित्रांनो
साधे-सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.
आलं का लक्षात मित्रांनो, आज आख्यान लावलंय ते पुरुष नसबंदीचं…आणि या आख्यानासाठी कथा निवडली आहे भारतमातेची.
फारफार वर्षापासून, नव्हे शतकानुशतकापासून भारतमाता नामेकरून एक मोठी देवता या भूतलावर वास करून आहे. कशी आहे ही?
(वंदे मातरम् गाऊन त्यातील वर्णन विषद करून सांगतात.)
मोठी जगन्मान्य देवता आहे ही. अहो हजारो वर्षाच्या हिच्या इतिहासात हजारो दैत्यांनी हिच्यावर घाला घातला पण ही बधली नाही. उलट यातल्या बऱ्याचश्या हल्लेखोरांना हिनी आपलसं केलं. इक्बालनी म्हणूनच ठेवलंय,
कुछ बात है के हस्ती, मिटती नहीं हमारी
सदियों रहा है दुश्मन, दौर-ए-जमाँ हमारा
सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्तां हमारा
तर अशी ही भारतमाता, हिच्यावर एकदा लोकसंख्यासूर नावाच्या राक्षसानी जोरदार हल्ला केला. आधी व्हायचं काय की भरपूर संतती जन्मायची आणि त्यातली भरपूर मरायची. पण पुढे पुढे अन्न पाणी सुधारलं, साथी कमी झाल्या, आणि माणसं चांगली म्हातारी होईपर्यंत जगू लागली. पण इथेच अडचण आली. या लोकसंख्यासुराची भूक भयंकर, इतक्या सगळ्या प्रजेच्या पोटाला काय घालायचं हा प्रश्न पडला, इतक्या सगळ्यांनी खायचं काय, ल्यायचं काय, इतक्या सगळ्या हातांना काम काय, इतक्या सगळ्या डोक्यांना शिक्षण कस द्यायचं, एक ना अनेक प्रश्न… हा लोकसंख्यासूर आता भारतमातेचेच लचके तोडायला लागला… कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना ते हे असं.
भारतमातेच्या पोटी, लेकरे कोटी कोटी…. अशी अवस्था झाली आणि
समर्थांनी म्हटलेलंच आहे,
लेकुरे उदंड झाली, ते तो लक्ष्मी निघोनी गेली;
बापुडी भिकेस लागली, काही खाया मिळेना.
लेकुरे खेळती धाकुटी, येके रांगती येके पोटी,
ऐसी घरभरी झाली दाटी, कन्यापुत्रांची.
पण भारतमाता हरली नाही, ती डरली नाही, ती लढायला सिद्ध झाली. रघुनाथ धोंडो कर्वे, म्हणजे आपल्या भारतरत्न धोंडो केशव कर्व्यांचे चिरंजीव बरं, हे तिचं लेकरू, तिच्या मदतीला धावलं. इतरही अनेक होते. (काही नावे घालायला हवीत) मग भारतमातेची लेकरं, लोकसंख्या नियंत्रणाच्या मागे लागली. पण तिथेही तऱ्हेतऱ्हेच्या लोकांचे तऱ्हेतऱ्हेचे सल्ले…
संत म्हणाले संयम पाळा,
महंत म्हणाले मोजके दिवस टाळा
सज्जन म्हणाले बाहेरच गाळा,
धर्ममार्तंड म्हणाले, चूप, अहो बोलता काय, तुमच्या जिभेला काही हाड?
जाउ दे, हा विषयच टाळा
सामान्यजन सगळ्यात हुशार, ते म्हणाले,
तुमचं ठरलं की सांगा तोवर, आमचा चालूदे कामुक चाळा
मग डॉक्टर आले, संशोधक आले, समाजसेवक आले, मायबाप सरकारही मदतीला धावले…
कुणी म्हणाले निरोध वापरा, कुणी म्हणाले तांबी बसवा, कुणी म्हणाले गोळ्या खा किंवा इंजेक्शने घ्या, आणि कुणी म्हणाले
आधी प्रपंच करावा नेटका,
व्हावी इप्सित संतती बरंका
पण मग साधता आकडा नेमका
मार्ग आप्रेशनचा धरावा
पण हे करायचं कुणी??
यातला निरोध वापरायचा… बाप्यांनी
पण…
तांबी??? बायांनी वापरायची
गोळ्या??? बायांनी खायच्या
इंजेक्शने??? बायांना टोचायची…
आणि आप्रेशने???… तीही बायांचीच करायची.
का म्हणून? सांगा ना, का म्हणून??? अहो निसर्गानी मूल होऊ द्यायची जबाबदारी स्त्रियांवर टाकलेलीच आहे, त्यात आपण काही बदल करू शकत नाही मग मूल न होण्याची तरी जबाबदारी पुरुषांनी घ्यायला नको का?
विश्व रागे झाले वन्ही, पुरुष सुखे व्हावे पाणी
शब्द शस्त्र झाले क्लेश, पुरुषी मानावा उपदेश
या पुरुषप्रधान संस्कृतीनी बायकांवर फार फार अत्याचार केले आहेत, काही कळत, काही नकळत, बायकांसाठी हे विश्व जणू वणवा झालं आहे…
विश्व रागे झाले वन्ही,
मग अशा वेळी पतींनी काय केल पाहिजे?
विश्व रागे झाले वन्ही, पती सुखे व्हावे पाणी
या वणव्यात पतीनी पाणी व्हायचं आहे. मूलं न होऊ द्यायची जबाबदारी स्वतःवर घ्यायची आहे. लोक म्हणतील, आलाय मोठा बायकोवर प्रेम करणारा! पाडगावकरांना भेटला होता असा एक माणूस, म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही,
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही
आमचं काही आडलं का? प्रेमाशिवाय नडलं का?”
तेंव्हा पाडगावकर त्याला एवढंच म्हणाले,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
पण तुमचं आणि आमचं अगदी सेम नसतं!
तेंव्हा कुणीही काहीही म्हणू द्या, जर तुमचं तुमच्या बायकोवर खर्रखुर्र प्रेम असेल तर लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, उलटून बोलू नका, उलट लोकांचे हे शब्द, हे शस्त्र झालेले शब्द, हे बोल ही संधी माना, त्यातून बोध घ्या,
विश्व रागे झाले वन्ही, पती सुखे व्हावे पाणी
शब्द शस्त्र झाले क्लेश, पती मानावा उपदेश
…आणि हे निव्वळ भावनिक आवाहन नाही बरं… मी म्हणतो त्याला वैद्यकनीतीचा, वैद्यकरीतीचा, वैद्यकशास्त्राचा आणि वैद्यकविवेकाचा भरभक्कम आधार आहे.
पुरुषांचं हे ऑपरेशन सोपं आहे… बायकांचं ऑपरेशन, महाकर्मकठीण… बायकांचं एकूणच सगळं अवघडच असतं म्हणा… पुरुषांच्या या ऑप्रेशनमध्ये आता बिनटाक्याची पद्धत आली आहे. नॉनस्काल्पेल व्हॅसेक्टॉमी म्हणजेच एन.एस.व्ही. म्हणतात त्याला.
म्हणूनच तर मी म्हणालो,

नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(… आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत…)
बोला… एनएसव्ही ऑपरेशsssन कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.

एन.एस.व्ही वरच्यावर करता येतं, ‘ये बाहर की बात है…’ बायकांच्या ऑपरेशनसाठी पोट उघडावं लागतं, ‘ये अंदरकी बात है…’ यामुळे पोटात इन्फेक्शन; आतडी, मूत्राशय वगैरेला इजा असे धोके टळतात. स्त्री नसबंदीच्या प्रत्येक केसमध्ये ती स्त्री, हे दोन्ही धोके पत्करत असते. बायकांचं अगदी बिनटाक्याचं ऑपरेशनही, पुरुष नसबंदीपेक्षा कितीतरीपट गुंतागुंतीचं आणि धोक्याचं आहे. पण लक्षात कोण घेतो? संसाराच्या रामरगाड्यात वैतागलेल्या बायकोचा विचार कोण करतो? तेंव्हा माझं सांगणं एवढंच आहे की…

अनुदिन अनुतापे तापल्या बायका ह्या
परमदिनदयाळा निरसी मोह माया
अचपळ मन तूझे नावरे आवरीता
एन.एस.व्ही.त शीण नाही धाव रे धाव आता
एन.एस.व्हीत शीण नाही, एन.एस.व्ही बाबतच्या शंकाकुशंकांनी अचपळ झालेलं तुझं मन आवर आणि एन.एस.व्ही सेंटरकडे धाव. बायकोला ऑपरेशन करून घ्यायला, ट्युबेक्टॉमी करून घ्यायला भाग पाडू नकोस, ती करते म्हणाली तर तू नको म्हण…

नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(… आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत…)
बोला… एनएसव्ही ऑपरेशsssन कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.

तर अशी ही बहुगुणी एन.एस.व्ही…. लिंगाच्या थोडं खाली अर्ध्या सेंटीमीटर छेदातून करता येते. अहो हा छेद घ्यायला पातं, म्हणजे ब्लेडसुद्धा लागत नाही. इतका छोटा छेद की हा बंद करायला टाका घ्यायला लागत नाही. थेंबभरसुद्धा रक्त वहात नाही आणि कोणतीही खूण रहात नाही.
बुंद ना गिरा एक लहू का, कछु ना रही निसानी
नाsss लागी, ‘नस’पे कटार
सगळी भूल द्यायची गरज नसते… जागेवर भूल देऊन काम भागतं, हे फारच महत्वाचं आहे. भूलीत नाही म्हटलं तरी धोके फार.
शिवाय हे झटपट किती…तपासणीपासून ते ऑपरेशनपर्यंत सारा मामला, दोन एक तासाची बात. पण तरीही हे कोणी करून घ्यायला पुढे येत नाही. पेशंट विचारत नाहीत, डॉक्टर बोलत नाहीत… अहो एखादा नरशार्दुल, एखादा नरपुंगव, एखादा नरसिंह, एखादा नरोत्तम झालाच तयार तर त्याची बायको, त्याची स्त्री, सखी, सचिव, भार्या, सौभाग्यवती, ती सती-सावित्री, पतिव्रता, म्हणते, ‘नको बाई माझंच करा, आमच्या ह्यांना फार काम असतं.’
कारण काय तर…
ह्यांनी म्हणे अशक्तपणा येतो…
कष्ट करता येत नाहीत…
सेक्स पॉवर कमी होते…
या ऑपरेशनमुळे पौरुषाला बाधा येते, तो कष्ट करू शकत नाही, तो माणूस एकदम कंडम बनतो, कंडोम नाही हं, कं ड म. दोन्हीत फरक आहे…. असे अनेक गैरसमज आहेत.
पण असं ज्या लोकांना वाटतं, त्याबद्दल निव्वळ त्यांना मूर्ख म्हणून आपली जबाबदारी संपत नाही. त्यांच्या या गैरसमजामागे त्यांचाही काही युक्तिवाद असतो. तो समजावून घेणं आणि दुरुस्त करणं महत्वाचं आहे. पारंपारिकरीत्या आपल्याकडे पुरुषत्वाचा संबंध शक्तीशी आणि स्त्रीत्वाचा सहनशक्तीशी जोडला आहे.

शारीरिक कष्ट करणं, मूल होणं आणि संभोगसूख देता-घेता येणं या वास्तविक तीन स्वतंत्र क्रिया आहेत आणि एकमेकांशी फारशा संबंधित नाहीत!!!!
शारीरिक कष्टासाठी शरीर सुदृढ हवं पण पुरुष बीजाची किंवा लिंगाला ताठरता येण्याची अजिबातच आवश्यकता नाही.
मुलं होण्यासाठी पुरुष बीज तयार होणं आणि शरीरसंबंध जमणं हे आवश्यक आहे, पण यासाठी तुम्ही बॉडी-बिल्डर असायची गरज नाही. अहो इथेच पहा ना, इथले बरेचसे पुरुष बॉडी-बिल्डर नाहीत आणि बऱ्याचशा पुरुषांना मुलंही आहेत. उलट अगदी धडधाकट असलेल्या, सैन्यात अधिकारीपदी असलेल्या, बॉडीबिल्डींग किंवा इतर खेळात चॅम्पियन असलेल्या व्यक्तींनाही मूल होण्यात अडचण असू शकते. पुरुष बीज निर्माण करणारी यंत्रणा आणि शारीरिक शक्ती यांचा थेट संबंध नसतो.
आणि कामसुखासाठी? लिंगाला ताठरता येण्यासाठी? पुरूषबीज तयार होण्याची गरज नाही. शरीरसंपदाही यथा तथा असली तरी चालते. उलट कामसौख्यासाठी, दांपत्यसुखासाठी मन सदासतेज असावं लागतं. कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवणारे गडी, पलंगावर सखीला चांदसितारे दाखवतीलंच असं नाही. कारण पलंग म्हणजे आखाडा नाही. कामसौख्य हे शारीरिक शक्तीचं प्रदर्शन नाही.
म्हणूनच नसबंदी केल्यामुळे पुरुषांची शारीरिक शक्ती, कामेच्छा, कामशक्ती संपतबिंपत नाही. संभोगसूख, वीर्यपतन वगैरे जैसे थे रहातं. वीर्य हे पुरूषबीज आणि इतर अनेक स्त्रावांचं मिश्रण असतं. ऑपरेशननंतर त्यात पुरूषबीज मिसळत नाही एवढंच. वीर्यातले बाकी घटक तयार होतच असतात. लैगिक भावना, लिंगाला होणाऱ्या संवेदना वगैरे कशावरच या ऑपरेशनचा दुष्परिणाम होत नाही.
म्हणून म्हणतो…
मन घायल पर तन पे छायी मिठी टीस सुहानी…
ना लागी ‘नस’पे कटार
उलट नको असलेल्या गर्भारपणाची भीती दूर झाल्यामुळे आता सुखेनैव संभोगसुखाचा अनुभव घेता आणि देता येतो.
मन घायल पर तन पे छायी मिठी टीस सुहानी…
नाsss लागी ‘नस’पे कटार
मोरोपंतांच्या काव्यात ढवळाढवळ करण्याची धिटाई मी का केली ते आता तुमच्या लक्षात आलं असेल.
एनएस व्ही सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा आवडो
तेंव्हा म्हणा…
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(… आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत…)
बोला… एनएसव्ही ऑपरेशsssन कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.

पुनरुत्पादनाच्या प्रत्येक पायरीचा आपल्या समाजानी उत्सव केला आहे. पाळी आली की नहाण विधी आहे, लग्न ठरलं की साखरपुडा आहे. लग्न म्हणजे तर दोन्ही घरचा अगदी प्रतिष्ठेचा प्रश्न, ती चमक-दमक, तो माहोल, व्वा, भाई वा! पुढे पहिल्या रात्रीसाठी खास चिडवाचीडवी आहे, धार्मिक विधीही आहे. दिवस राहिल्यावर डोहाळे जेवण आहे, बागेतलं आहे, झोपाळ्यावरचं आहे, अगदी चंद्रावरचं सुद्धा आहे. मूल झाल्यावर पेढे-बर्फीचं उत्साही वाटप आहे आणि ध्वनीक्षेपकांची भिंत उभारून गाव दणाणून टाकणारं बारसं सुद्धा आहे. पण पुनरुत्पादनाची क्षमता संपवणं, म्हणजे नसबंदी करून घेण्याचा काही उत्सव अजून निघाला नाहीये. तेंव्हा ज्यादिवशी, ‘नुकतच आमच्या मोठ्या दिरांचं एनएसव्हीच ऑपरेशन झालं; उद्या पूजेला या बरंका अशी नसबंदी नारायणाची निमंत्रण येतील तो सुदिन.’
बोला…
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(… आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत…)
बोला… एनएसव्ही ऑपरेशsssन कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.

Dr. Shantanu Abhyankar

M.D OBGY

पुरुष कभी रोते नहीं हैं

कई बार मैं कई मौकों पर रोना चाहता हूँ. चिल्ला चिल्ला कर रोने का मन करता है. बहुत सारे मौकों पर जो अन्दर का “मैं” होता है वो रोना चाहता है. मेरे ही जैसा बहुत सारे पुरुष भी फील करते होंगे. मगर एक जो हम पुरुषों की बचपन से जो कंडीशनिंग की गई होती है न कि “लड़के/मर्द/पुरुष कभी रोते नहीं हैं” वो हम लोगों के रोने को ब्रेक लगा देता है. यही जो ब्रेक होता है न वही पुरुषों की बदसूरती और हार्ट अटैक का एक कारण भी बनता है. मोस्टली पुरुष बदसूरत मिलते हैं… उनकी स्किन खराब होती है… ग्लो जैसी चीज़ें उनसे दूर रहती हैं. और एक अलग सी रफ़नेस पुरुषों में देखने को मिलती है जो कि महिलाओं में देखने को नहीं मिलती. न्यूरो-साइंटिफिक पर्सपेक्टिव्स से देखा जाए तो खूबसूरत दिखने के लिए रोना भी बहुत ज़रूरी है. यह रोने की आर्ट महिलाएं बख़ूबी जानतीं हैं. और यह औरतें इतनी ज़बरदस्त रुआंटी होतीं हैं कि इनका रोना देख कर बेचारे पुरुष रोना भूल चुके हैं. मेंटल हेल्थ और स्टेबिलिटी के लिए रोना बहुत ज़रूरी है. रोने के कई फायदे हैं जिसका यूज़ सबसे ज्यादा बाय डिफ़ॉल्ट महिलाएं ही कर पाती हैं. रोने से किसी भी तरह का स्ट्रेस दूर हो जाता है यहाँ तक कि जो नॉन-इमोशनल टीयर्स होते हैं उनसे भी हमारी बॉडी में काफी सारे पॉजिटिव फिजियोलॉजिकल चेंजेज़ होते हैं. प्याज़ छिलने, हँसने और ठसका लगने से जो आँसूं निकलते हैं उन्हें नॉन-इमोशनल टीयर्स कहते हैं.

रोने से मेंटल टफनेस बढती है जो आपको लेस प्रोडक्टिव होने से, ड्रग्स और शराब जैसी गन्दी चीज़ों से दूर रखती है. रोने से आप खराब से खराब सिचुएशन को भी हैंडल करने के लिए तैयार हो जाते हैं. रोने से आपका समाज में एक पॉजिटिव रिप्रजेंटेशन होता है जो आपके सामाजिकता को बढाते हुए आपका सामाजिक दायरा मजबूत करते हैं. इसलिए महिलाएं बहुत सामाजिक होतीं हैं. उनके सोशल कॉन्टेक्ट्स बहुत सही और स्ट्रोंग होते हैं. उन्हें किसी ड्रग्स या शराब की ज़रूरत नहीं होती. पुरुषों में इसलिए सामाजिकता नहीं पाई जाती क्यूंकि वो अपना इमोशनल बर्स्ट करना अपनी शान के खिलाफ़ समझते हैं. इसलिए उन्हें ड्रग्स या शराब की ज़रूरत पड़ती है. पुरुषों की कंडीशनिंग उनके ही घर में ख़राब होती है. उन्हें बचपन से यही बताया जाता है कि रोना नहीं है. प्रकृति ने महिलाओं को रोने की ताक़त देकर उनका नैचुरली एम्पावरमेंट (सशक्तिकरण) किया है. और यह नेचुरल वीमेन एम्पावरमेंट इसलिए किया गया है ताकि यह मुश्किल से मुश्किल घड़ी में जहाँ पुरुष आत्महत्या कर लेते हैं वहां यह डट कर सिचुएशन का मुकाबला कर सकें. देखा ही होगा कि पुरुष जब कुछ नहीं कर पाता है तो या तो माँ-बहन की गाली देता है या फिर आत्महत्या. इसलिए पुरुषों में आत्महत्या की दर काफी है.

आज ऑक्सफ़ोर्ड यूनिवर्सिटी में हुए एक साइकोलॉजिकल रिसर्च के बारे में पढ़ रहा था कि सोशल मीडिया में जो लोग अपने स्टेटस में “‘इट’स कौम्प्लीकेटेड”… “इन अ रिलेशनशिप” लिखते हैं वो लोग दूसरों से अटेंशन पाना चाहते हैं… जिससे कि उनका यह लिखा देख कर लोग उनसे सहानुभूति दिखाते हुए बात करें. एक एनालिसिस में यह भी निकला कि जो लोग अपने रोमांस या सेक्स पार्टनर… स्पाउस (जाहिलों को बता दूँ कि स्पाउस मतलब आपके हस्बैंड या वाइफ से होता है) के फोटोग्रैफ्स सोशल मीडिया पर अपडेट करते हैं वो लोग मेंटली कमज़ोर होते हैं. इनमें बहुत ही लो सेल्फ एस्टीम होता है. इन्हें अपने स्पाउस से बिल्कुल भी प्यार नहीं होता… चूँकि यह कम्पैनियन शिप के मामले में कमज़ोर होते हैं तो दुनिया को और खुद को लाइक्स और कमेंट्स के ज़रिये खुश दिखाने की कोशिश करते हैं.

चलते चलते बताता चलूँ कि वीमेन एम्पावरमेंट तब सक्सेसफुल समझा जाना चाहिए जब कोई भी महिला अपनी सेक्सुअल डिमांड और फीलिंग्स को अपने पार्टनर के सामने खुल कर रख सके. सेक्स की बात और सेक्सुअल डिमांड रखने पर कोई उसके करैक्टर पर सवाल न उठाये. जिस दिन महिलाएँ एक्सप्रेशन ऑफ़ सेक्स को गिल्ट के रूप में लेने से बाहर आ जाएँ उसी दिन सही मायनों में वीमेन एम्पावरमेंट होगा… फेसबुकिये जाहिलों और एवरेज लोगों को बता दूँ कि वीमेन एम्पावरमेंट को हिंदी में महिला सशक्तिकरण बोलते हैं.

Mahfooz Ali

आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि FGM

fgm-campaign-page-jpg

FGM हा प्रकार केवळ आफ्रिकेत नाही तर भारतामध्ये स्त्रियांची सुंता करणे हा प्रकार बोहरा समाजात चालतो ज्याला खतना असे म्हणतात. वयात येणाऱ्या मुलींच्या जनांगातील अवयव कापले जातात ते कधी ब्लेड, गंजलेले चाकु व काचेच्या धारदार भागाने आणि त्यात बऱ्याच वेळा रक्तर्स्त्राव आणि जखमांना त्या बळी पडतात.

हि प्रथा बंद व्हावी यासाठी मुंबईतील पत्रकार आरेफा जोहारी हिने ‘सहियो ‘ नावाची संघटना उभी केली आहे. ती स्वतः या प्रकाराचा बळी आहे आणि अन्य मुलींना वाचविण्यासाठी तिची धडपड आहे. सहियो संस्थेच्या ओनलाईन सर्वेक्षणात 81% स्त्रियांनी हि प्रथा बंद व्हाव्ही असे म्हटले आहे. कधी होणार स्त्री मुक्ती या देशात?

स्त्रिया म्हणजे काय गणपतीच्या मूर्ती थोड्या आहेत की 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनोत्सव म्हणून त्यांची पूजा करायची आणि नंतर विसर्जन करायचे. मागच्या महिन्यात एक बाल विवाह रामोजी फिल्म सिटी जवळ असलेल्या एका वेद पाठशाळेत आम्ही थांबवला . मुलगी 13 आणि मुलगा 16 वर्ष वय. परिवार सुशिक्षित . मुलीची आई कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक. मग काय फायदा त्या शीक्षणाचा . त्यापेक्षा अडाणी बरें म्हणायचे😢

सांगली जिल्ह्यातील म्हाईसाळ गावात 19 अर्भक नाल्यात फेकून दिलेली सापडली. सीमावर्ती भागात लिंग चाचणी करून अश्या प्रकारे भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे . डॉ सुदाम मुंडेंची अवलाद वाढत चालली आहे. कधी थांबणार हे दुष्टचक्र??

पुरुषांची स्त्रियांकडे पहाण्याची मानसिकता बदलन्याबरोबरच स्त्रियांनीही भीतीला न घाबरता स्वतः च्या क्षमतेवर विश्वास ठेवला तर कधीही त्या बळी पडणार नाहित असा आत्मविश्वास आहें . सर्वांनी मिळूनच स्त्रियांना सामाजीक, मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचा संकल्प आज करुयात आणि महिलांच्या कर्तुत्वाला सलाम करत येणारा प्रत्येक दिवस हा महिला दिनोत्सव म्हणून साजरा करूयात या अपेक्षांसह.

10570377_10204758590698905_3128255435502498171_n
महेश भागवत

Mens Health and STDs - ThatMate

Men’s health – Sexually Transmitted Diseases

Reproductive tract infections are infections of the genital tract. Like women, men can have similar reproductive tract infection. However, in men, sexually transmitted infections are much more common than those that occur by overgrowth of normally present bacteria in the genital tract.

srfaSome STDs are Caused by Bacteria:

 • Syphilis
 • Gonorrhea
 • Lymphogranuloma Venereum (LGV)
 • Chlamydia

Some STDs are Caused by Viruses:

 • Herpes
 • HPV
 • (Human Papillomavirus which can cause Genital or Anal Warts)
 • Hepatitis A, B, C
 • HIV (Human Immunodeficiency Virus—the virus that causes AIDS)

Other than this, Public lice (“crabs”) are parasitic insects found in the genital area of humans. Scabies is an infestation of the skin with the microscopic mite. These are basically skin infections but are considered STD as you can acquire it from your infected partner.

How Do I Know If I Have an STD?

Many STDs don’t have symptoms you can see or feel. Some of the symptoms may include-

 • Bumps or sores around your penis, anus, or mouth.
 • Discharge from your penis or anus.
 • Rash on your body.
 • Burning sensation/pain when you urinate.

The only way to know for sure if you have an STD is to have regular testing for STDs.

Are you at risk for getting STDs?

Anyone who has sex can get STDs! However, certain behaviors such as not using condoms, multiple partners increase the risk of getting an STD. According to the CDC, USA sexually active gay, bisexual and other men who have sex with men (MSM) are at greater risk.

STDs are spread through sexual contact with someone who has an STD. Sexual contact includes oral, anal, and vaginal sex, as well as genital skin-to-skin contact.

Some STDs—like HIV, chlamydia and gonorrhea—are spread through sexual fluids, like semen. Other STDs, including HIV and hepatitis B, are also spread through blood. Genital herpes, syphilis, and human papillomavirus (HPV) are most often spread through genital skin-to-skin contact.

Can they be treated?

Bacterial infections can usually be cured with antibiotics. If you are under treatment for STDs it is extremely important to finish all of your medicine, even if you feel better. Your partner should be tested and treated, too. Also remember that you are at risk for the same or a new STD every time you have unprotected sex (not using a condom) and/or have sex with someone who has an STD.

Viruses such as Herpes and HIV usually can’t be cured. Your doctor might give you some medicine or other treatment that keeps you from getting sick or helps control your symptoms.

For lice and scabies lotions/pills are available to treat either.

How can you protect yourself?

Be SAFE!

It is good idea to get to know someone before having sex with them and talk honestly about STDs and getting tested.Use a condom correctly EACH AND EVERY time you have sex.Limit your number of partners. You can lower your risk for STDs if you only have sex with one person who only has sex with you.

Be smart! Think before getting into things that might cloud your judgement and lead you to risky behavior- such as having unprotected sex!

Vaccines: There are vaccines available that protect you against Hepatitis A, Hepatitis B and some forms of HPV. Hepatitis B vaccines are a part of our National Immunization Schedule so you have probably been vaccinated after birth. HepA and HPV guidelines vary from country to country so you may consult your doctor for further details.

Get tested: If you think you’ve been exposed to a partner with STD, visit your doctor. Knowing your status will help you protect yourself as well as your partner.

Aprateem Mukherjee. Resident, Radiology, Medical College, Kolkata

* Disclaimer:This answer is for general informational purposes only and is not a substitute for professional medical advice. If you think you may have a medical condition, consult your doctor immediately. Always seek the advice of your doctor before starting or changing treatment.

 

(आपल्या समाजात) आम्ही पुरुष वाढतो कसे?

 

images-3

थोडंफार गोंडस असं वयवर्ष ढकललं की आम्ही पुरुष वयात येतो. आमच्याशी ना कोणी कुठल्या सेक्स या विषयावर बोलत, ना आम्हाला कुठली माहिती मिळत. आम्ही तसेच शरीरातले दिवसेंदिवस होणारे बदल घेवून जगत असतो. एरवी शेंबडी वाटणारी पोरगी आम्हाला आता गोड वाटू लागते. त्यात चित्रपटांचा आमच्यावर ठार प्रभाव असतोच. हिरो-हिरोइन आमच्या डोक्यात घर करून बसलेले असतात. जसजसं वय वाढतं तसतसं आमच्यात बॉलीवूड संख्या वाढायला लागते. आम्ही बाहेरून कितीही शाहरुख दाखवत असलो तरी आमच्या नसानसांत इम्रान हाश्मी धावत असतो.

जूनपर्यंत आमच्याशी काही बोलावं असं कोणालाही वाटत नाही.

यमकांची जुळवा जुळव करत आम्ही कविता करायला लागतो. अगदीच भंगार असतात त्या, तरी कसल्या सोल्लिड वाटतात त्या. शरीरातले होर्मोन्स रंग दाखवायला सुरुवात करतात. मुलीबद्दल वाटणारं आकर्षण हे दिवसेंदिवस वाढतच असतं. मुलींबद्द्लची, तिच्या शरीराबद्द्लची आमची उत्सुकता आता एवढी शिगेला पोहोचते की आम्ही जिथून मिळेल तिथून माहिती काढायला लागतो. टपरीवर बसलेल्या पानवाल्याकडून असो नाहीतर सिक्युरिटी गार्ड असो आम्ही हळूहळू मुलींचे उघडे नागडे फोटो पाहायला लागतो. Breast, Vagina.… तोपर्यंत आमच्यातलं मुल कधीच संपलेलं असतं.

पण अजूनपर्यंत आमच्याशी काहीही बोलावं असं कोणाला वाटत नाही.

घरात नुसतं किसिंग सीन असला कि लगेच आमचे पालक च्यानल चेंज करतात. त्यांच्यामते आमच्या वयाला ते योग्य नसतं. कॉलनीमध्ये असणारी प्रत्येक मुलगी ही पालककृपेमुळे आमच्यासाठी ताई झालेली असते. पण हार्मोन कृपेमुळे आता मुलींना बघताना आमच्या नजरा बदलल्या असतात. मुलींचे Curves आमचं लक्ष लगेच वेधून घेतात.

तरी अजूनपर्यंत आमच्याशी काही बोलावं असं कोणाला वाटत नाही.

दिवसेंदिवस होर्मोन्स आपला प्रखर उजेड पाडायला लागतो. मग कधीतरी रात्री Nightfall व्हायला सुरुवात होते. हेही कुणी आमच्याशी बोललेलं नसतंच. Nightfall …. श्शी. म्हणजे ? म्हणजे Wetdreams. म्हणजे ? म्हणजे चड्ड्या ओल्या. ‘आपण काहीतरी वाईट विचार केलेला आहे’, ‘आपण काहीतरी घाण स्वप्न पाहिलेलं आहे’ … त्या चिकटात झोपणं शक्य नसतंच, आम्हाला जाग येते. मग कुणालाही न कळता, मध्यरात्री उठून चड्ड्या धुवायच्या. कारण किती ही शरमेची बाब. आमच्यासाठी तोपर्यंत ते घाणच असतं. कारण लग्न होईपर्यंत अशा गोष्टी पाप तरी असतात, नाहीतर वाईट तरी … हे आमच्यावर समाजाने बिंबवलं असतंच.

अशा कितीतरी रात्री चड्ड्या ओल्या होवून आम्ही उघडतो मग Masturbation नावाचं जग. ते तेव्हाही भारीच होतं आणि आताही. हळूहळू Masturbation वाढत जातं आणि Nightfall कमी कमी होत, बंद होतं. कधीकधीतर Nightfall होवू नये म्हणून आम्ही झोपण्याआधी Masturbation करतो. हे सगळं एखादं जंगली झाड स्वत:हून वाढावं तसं आम्ही तो बदल आत्मसात करत असतो, शिकत असतो.

मग नाक्यावरती उभं राहणं सुरु होतं. हिला बघ, तिला बघ. मग मुलींना वेगवेगळी नावं पडू लागतात. कुणी चिमणी होतं, कुणी पाखरू, कुणी डॉल, तर कुणी माल. Curves नसलेली मुलगी आमच्यासाठी कॅरमबोर्ड होते. आमचे मेंदू आता वासानेनी पूर्ण नासके झालेले असतात. आता आमचा प्रवास पूर्ण चुकीच्या दिशेने सुरु होतो. आम्हाला आता पोरी पटवाव्याश्या वाटू लागतात, टुव्हीलरवर मागे पोरी फिरवाव्याश्या वाटू लागतात. कचकचून ब्रेक दाबणं हे आधीच कल्पून झालेलं असतं.

मग सुरु होते आमची सिड्यांची घेवाण देवाण. म्हणजे Porn. इथे आम्हाल सगळी माहिती मिळते.
‘अच्छा, मुल इथून येतं तर’ …. त्या पोर्नमध्ये बायका ओरडतात, ते actor जे करतात ते आम्ही खरं मानायला लागतो. “Virgin मुलगी म्हणजे सेक्स न केलेली”, हे सगळे गैरसमज मेंदू नासाडी करायला सुरुवात करतात. पुरुषी अहंकारही आम्ही जोपासलेला असतोच किंबहुना समाजाने तो गिफ्टच दिलेला असतो. हे सगळं नित्यनियमाने रोज गुपचूप चाललेलं असतं.

ते वय फार धोक्याचं असतं.
पण अजूनही आमच्याशी काही बोलावं असं कोणाला वाटत नाही.
ना आम्हाला कोणी निरोध म्हणजे काय याबद्दल माहिती सांगत, ना चित्रविचित्र रोगांबद्दल आम्हाला सांगितलं जात. सगळी माहिती आम्हाला “ते” मधुचंद्राच्या रात्री देणार असतात कि काय कुणास ठावूक.

आमच्या मनात तेव्हा काय काय येत असतं आणि आम्ही कसली स्वप्नं पाहतो याची कुणाला साधी कल्पनाही नसते. बाजूवाली असो, आंटी असो, कि कुठली कामवाली … आमचे हॉर्मोन्स अगदी गळयापर्यंत आलेले असतात. त्यांना फक्त “बाई” हवी असते. नाही म्हटलं तरी १% मेंदू गुन्हेगारीकडे वळणारच असतो. मुलीला भूल द्या, Drugs द्या, नशा करा …. कसंही करून तिचा उपभोग घ्या. हे हार्मोन्स फार वाईट असतात. ते कुणाला काहीही बनवू शकतात.

आपला समाज हा संस्कृतीच्या नावाखाली आपली प्रगती रोखतो.आपला समाज हा माणूस म्हणून मोकळेपणा देत नाही. तो शक्य होईल तेवढी बंधनं टाकतो.आपला समाज माणसाला माणूस म्हणून समजून घेत नाही.आपला समाज बुरसटलेल्या विचारातून अजूनही बाहेर येत नाही.

आमच्या समाजाला अजूनही Sex Education ची गरज वाटत नाही.आपल्याला वाटतं, हे उद्या बदलेल,
पण तोपर्यंत आपण समोरच्या पिढीलाही नासवलेलं असतं.मग ती पिढी फक्त शिकते, इंजिनिअर-डॉक्टर होते, चांगली नोकरी मिळवते, पण बुरसटलेल्या पुराण कुजलेल्या वेशी त्यांना सोडता येत नाहीत.आम्ही पुरुष वाईट नसतो, पण चांगलं घडावं म्हणून समाजाचं योगदानही शून्यच असतं.किंबहुना नकळत ते आम्हाला वाईट रस्त्यावरच येवून सोडतात.
ज्याने शोधला चांगला रस्ता, त्याला सापडला.जे त्याच्या वाटेत आलं, ते त्याने त्याच्या कुवतीप्रमाणे झेललं आणि तो वाढला.

शेवटी सिमोनला देखील पटलंच ना, “स्त्रीसारखा ‘पुरुषदेखील’ समाजच घडव असतो”

Mangesh Sapkal

http://www.mangunangu.com/